सासऱ्याच्या घरी जावई आला आणि बेपत्ता झाला,वडकी पोलीसात तक्रार दाखल

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिधोरा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून असनारे आर.के सुखदेवे यांचे जावाई सह पत्नी घेऊन सासरी पाहून पणा आले व बेपत्ता झाले. सविस्तर वृत्त असे रिधोरा येथील जिल्हा परिषद शाळेवरील मुख्याध्यापक असनारे आर. के सुखदेवे हे वडकी येथे राहत आहे. त्यांच्या मुलीचे लग्न १४ फेब्रुवारी२०१९ रोजी सुमित निरंजन ढोके वय ३६ वर्षे रा.पिंपळखुटा, ता.मोर्शी, जिल्हा अमरावती यांच्या शी झाले होते ते वडकी येथे आपल्या पत्नीसह सासरी आले होते सगळे काही गोडी गुलाबीने हासी मजाक चालू असतांना जावाई बापू दि २० मार्च रोजी सासरे बुवा यांच्या घरची पाळलेली कुत्री घेऊन बाहेर फिरायला जाते असे म्हणून घरुन निघून गेले होते काही वेळानी कुत्री घरी वापस आली पण जवाई बापू घरी परत आले नाही. म्हणून आर.के सुखदेवे यांनी आजुबाजुच्या गावात व नातेवाईक यांच्या कडे शोध घेतला असता ते कुठेही मिळुन आले नसल्याने या संदर्भात वडकी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती बेपत्ता झालेले जावाई याचे सासरे आर.के सुखदेवे यांनी दिली वरील बेपत्ता झालेला जावाई सुमित निरंजन ढोके हे कुठेही आढळून आल्यास वडकी पोलीस स्टेशनला संपर्क साधला असे आव्हान आर.के सुखदेवे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा रिधोरा यांनी केले आहे.