
▪️रमाई घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा.
नगराध्यक्ष,मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे नगरसेवकांची मागणी
पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी:- आशिष नैताम
८ जून : पोंभूर्णा शहरात रमाई आवास घरकुल योजनेचे लाभार्थी गेल्या तीन/चार वर्षापासून घरकुलाच्या प्रतिक्षेत आहेत. सध्या घरकुल लाभार्थी आज ना उद्या घर मिळेल या आशेवर मोडक्या तोडक्या घरात दिवस काढत आहेत. त्यांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्याचे दिवस येत असून त्यांची घरे कधी जमीनदोस्त होतील सांगता येत नसल्याने रमाई घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांच्या कडे गटनेता तथा विरोधी पक्षनेता आशिष कावटवार,नगरसेवक अतुल वाकडे,नगरसेवक बालाजी मेश्राम, नगरसेविका रीना उराडे यांनी निवेदनातून केली आहे.
नगरपंचायत पोंभूर्णा येथील लाभ घेणाऱ्या रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित ठेण्यात येत आहे. मागील पाच ते सहा वर्षापासून आपला प्रस्ताव,अर्ज नगरपंचायत कार्यालयात सादर केलेला आहे.
पोंभूर्णा शहरातील या योजनेमध्ये नागरिकांना २ करोड ५२ लक्ष रुपये रमाई आवास योजनेचा निधीही गेल्या वर्षाभरापासुन प्राप्त झाला. मात्र किरकोळ कारणे व जिल्हाधिकारी यांच्या कडे बैठकीची तारीख ठरत नसल्याचे कारण दाखवून लाभार्थ्यांना मागील तीन ते चार वर्षापासून घरकुल योजनेपासून वंचित ठेवलेले आहे. घरकुल
देण्यासाठी वारंवार कागदपत्र व बैठकीचे कारण समोर करून टोलवाटोलवी केली जात आहे.
तरी येत्या आठ ते दहा दिवसात रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ नगर प्रशासनाच्यावतीने देण्यात यावा अन्यथा लाभार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विरोधी पक्षनेता आशिष कावटवार, नगरसेवक अतुल वाकडे,बालाजी मेश्राम व नगरसेविका रीना उराडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे…।।
