राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील खळबळजनक घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
पतीने घटस्पोटा नंतर पत्नीवर वारंवार अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येशील एका महिलेवर घडली आहे. सविस्तर वृत्त असे की आरोपी संजय भानुदास मडावी वय वर्ष २५ व्यवसाय वकील राहणार बोरी तालुका झरी जामनी याने आपल्या पदविचा दुरुपयोग करून पिडीत महिलेला कोणतीही माहिती न देता वि दिवाणी न्यायालयात झरी जमणी येथे घटस्फोटा करीता अर्ज सादर करून वि दिवाणी न्यायालयामधून पिडीत महिलेच्या नावाने निघालेला समन्स पिडीत महिलेला प्राप्त न होऊ देता त्यावर पिडीत महिलेची खोटी सही करून वि दिवाणी न्यायालयात समन्स परत पाठविले. त्यामुळे पिडीत महिला वि दिवाणी न्यायालयात हजर होऊ शकली नाही त्या अनुषंगाने वि दिवाणी न्यायालयाने आरोपी संजय मडावी च्या बाजूने एकतर्फी निकाल देऊन घटस्पोट मान्य केला.
आरोपी यांनी पिडीत महिलेची फसवणूक करून तिच्या माहेरी वाढोणा बाजार येथे जाऊन तिला इतर ठिकाणी घटस्पोटा नंतर पत्नी म्हणुन सोबत घेऊन जाऊन पिडीत महिले सोबत ३०/१०/२०१७ ते ०४/०४/२०२२ पर्यंत शारीरीक संबंध प्रस्तापित करून वारंवार अत्याच्यार केल्याची. २४/०५/२०२२ रोजी दिलेल्या पिडीत महिलेच्या तक्रारीवरून आरोपी संजय मडावी यांच्यावर गुन्हा नोंदवुन पुढील तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव करीत आहेत.
