नाम तो सूनाही होगा ”द रियल हिरो… नितीन जी भुतडा”


महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव,महागाव


महागाव तालुक्यात पावसाने होत्याच नव्हतं झालं.शेतातील कोवळी पिके तर नेस्ताबूत झालीत सोबतच अनेक कुटुंब उघड्यावर आली. हिवरा परिसरात असलेल्या अनंतवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आनंदनगर या ६० घरांची वस्ती असलेल्या तांड्याला पुस नदीच्या पाण्याने प्रचंड वेढा घातला होता.ही बातमी समजताच भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा समन्वयक नितीन भुतडा साखर सकाळीच या पूरग्रस्त भागाकडे दाखल झाले. आणि प्रशासनाला कामाला लावले.एन डी आर एफ असो वा एस डी आर एफ यांना पाचारण करण्यासाठी नितीन भाऊंनी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला अवगत केले.काही वेळातच ह्या बचाव कार्यासाठी तुकड्या सज्ज झाल्या. नितीन भाऊंनी आणि प्रशासनाने संपूर्ण स्थितीची माहिती दिली.कोण्या प्रकारे पूरग्रस्तांना सुरक्षितपणे बाहेर काढता येईल याची कानमंत्र दिले.लगेचच बचाव कार्य सुरू करण्यात आले. दुपारचे १२ वाजले.नितीन भाऊ उपाशीच होते.
त्यावेळी प्रशासनही पूर्णपणे कामाला लागले. नितींन भाऊंना अनेक ठिकाणावर फोन येत होते.नुकसानीची माहिती मिळत होती.ते अनेकांना शांतपणे धीर देत होते.पण नितीन भाऊ एकच ध्येय ठेवून उराशी होते .ते म्हणजे आनंदनगर येथील पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्याचे. एसडी आरएफटीमला पुराच्या पाण्याने प्रचंड कसरत करावी लागत होती.त्यामुळे रेस्क्यूं ऑपरेशन च बचाव कार्य कासव गतीने काम करत होते. एकीकडे नितीन भाऊंना ४३ नागरिकांचा मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. क्षणाचाही विलंब न करता खरी ताकत नितीन भुतडा यांनी प्रशासनासमोर दाखवणे सुरू केले. आ.मदन येरावार यांना कॉल करून परिस्थितीची माहिती दिली आणि लगेच थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कॉल करून घटनेचे गांभीर्य सांगितलं. आ.मदन येरावार यांनी उपमुख्यमंत्री यांना सविस्तर माहिती दिली.तीच माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नितीन भाऊंनी दिली.

एसडीआरएफटीम नागरिकांना रेस्क्यू करून वाचविण्याचे प्रयत्न करीत होते.परंतु निसर्ग साथ देत नसल्याचे देवेंद्र जिंना पटवून नितीन भाऊंनी सांगितले.राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी काय करायला पाहिजे असा प्रश्न केला. नितीन जी म्हणाले साहेब वायुदल शिवाय पर्याय दिसत नसल्याचे सांगून त्यांचा उर दाटून आला. राज्याचे मुख्यमंत्री यांनीही मुख्य सचिवांना तातडीने नितीन जी यांच्या मुद्याकडे लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना केल्या.परत राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आ.मदन येरावार आणि भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांना कॉल करून २ हेलिकॉप्टर पाठवत असल्याचे सांगितले.प्रशासनही हादरलं.हेलिकॉप्टर म्हणून अवाक झाला.प्रशासनाने हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागा नाही असे सांगून नितीन जी समोर प्रश्न उभा केला.नितीन जी परत महागाव कडे आले .हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.पण हेलिकॉप्टर उतरवणे शक्य नसल्याचे उत्तर मिळाले. आत करायचे काय म्हणून ते बैचेन झाले.परत खडका येथे पोहाचले.प्रशासनही जागा पाहून थकले.अखेर नितीन जी यांनी वायुदलाच्या अधिकाऱ्यांना कॉल करून चक्क राष्ट्रीय महामार्गावर हेलिकॉप्टर उतरवण्याचे सांगितले. हे एकूण प्रशासनही थक्क झाले. ही बातमी वाऱ्यासारखी जिल्हाभर पसरली.आणि हे अशक्य असल्याचे सोशल मीडियावर प्रतिक्रिया येवू लागले. अशक्यला शक्य करून दाखवणे नितीन भुतडा यांचा छंदच परिचित आहे. पावसाचा ओघ कमी झाला.तेवढ्याच पुन्हा वायुदलाच्या कर्मचाऱ्यांचा नितीन भुतडा यांना कॉल आला. हेलिकॉप्टर साठी लागणारे इंधन कमी आहे. त्यावेळी नितीन जी भुतडा यांनी नागपूर विमानतळ पर्यंत घेवून या इंधनाची सोय ताबडतोब करतो असे सांगून हेलिकॅप्टर नागपूर पोहचे पर्यंत ५००० लिटर इंधन नागपूर विमानतळावर सज्ज झाले.
पाण्याचा ओघ कमी झाला एसडीआरएफ ची टीम पुन्हा आनंदनगर च्या दिशेने पाठवली. पुराचे पाणी कमी झाल्याने एस डी आर एफ कशी बशी पुरपीडित गावात पोहचली.तेवढ्यात १ हेलिकॉप्टर नागपूर येथे पोहचल.इंधन टाकले.आणि हेलिकॉप्टर आनंदनगर च्या वर घिरट्या घालू लागल. गावकरीही अवाक झाले.काहींनी तर स्वप्न पाहत असल्यासारखे डोळे झटकले.
एस डी आर एफ च कार्य तर सुरूच होत. काहींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचं भाऊंना कळल. पण अखेरचा जीव वाचवण्यासाठी जिद्द सोडायची नाही अशी जिद्द होती. हेलिकॅप्टर राष्ट्रीय महामार्गावर उतरलं.हा थरार अनेक जन डोळ्यांनी पाहत होते. हेलिकॉप्टर मधील कर्मचाऱ्यांना मॅप द्वारे अडकलेल्या नागरिकांची आणि गावाची माहिती दिली. बचाव कार्याला आता यश येणार म्हणून भाऊ आनंदित होतें. हेलिकॉप्टर सुरू झालं.आणि आनंदनगर कडे रवाना झाला.पुन्हा निसर्गाची साथ मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परत आल्. भाऊंना कर्मचारी म्हणाले . गावात मोठ्या प्रमाणात उंचीवर झाडे असल्याने बचाव कार्याला अडथळा निर्माण होत आहे. हेलिकॉप्टर कर्मचाऱ्यांनी बरीच चर्चा केली. तत्पूर्वी एस डी आर एफ च्या दलाच्या जवानांनी सर्वच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती भाऊंना मिळाली.भाऊंनी हेलिकॉप्टर कर्मचाऱ्यांना मिशन यशस्वी झाल्याचे सांगितले.मदतीला आलेल्या हेलिकॉप्टर कर्मचाऱ्यांना कौतुकाची छाप दिली.आणि आभारही मानले. पावसाचा ओघ पूर्णपणे कमी झाल्याने सुरक्षित ठीकणी हलवण्यात आलेल्या नागरिकांची भेट घेवून त्यांना जेवणाची व्यवथा केल्यावरच परत उमरखेड कडे जाण्याचं मनात भाऊंच्या मनात ठरलं.हेलिकॉप्टर यवतमाळ कडे रवाना झाल. नितीन भाऊ आणि संपूर्ण ताफा अनंत्वाडी येथील जिल्हा परिषद शाळेकडे निघाल.जेवण तर तयारच होत. .ताफा पोहचला.मिडीयाही पोहचली..एस डी आर एफ च्या जवांनान कौतुकाची धाप दिली.कोणी राहील तर नाही ना असे विचारले.मात्र कोणीच शिल्लक राहील नाही.सर्व सुखरूप आहेत.असे समजल.
नितीन भाऊंनी पुरपिडीत नागरिकांना धीर दिला. आणि जेवण दिलं.रात्र झाली.

दुसरा दिवस उजाडला.


मी व पत्रकार रियाज पारेख त्या ठिकाणी पोहचलो. पुराणे वेढा घातलेल्या गावातील नागरिकांची पहिली तोंडी मुलाखत घेतली.त्यांचा पहिला प्रश्न होता. नितीन भाऊ भुतडा नसते तर आज आमचा मृतदेह तुमच्या समोर असते . रियाज पारेख हे भावनिक झाले. तो नागरिक म्हणाला. कुठे आहेत नितीन भाऊ आले नाही का? , पत्रकार रियाज पारेख त्या नागरिकांला नितीन भाऊंना कॉल लावून दिला.आणि त्या नागरिकाला फोन बोलायल दिला. अश्रूनयांनी नागरिक नितीन जी यांचे आभार मनात होता. पूर्नेजीवन असल्याचे सांगत होता.

या सर्व रेस्क्यू ऑपरेशन मध्ये प्रशासनही सहभागी होत.मात्र पिक्चर चां हिरो होता तो नाम तो सुनाही होगा नितीन जी भुतडा