वासुदेव ची परंपरा लुप्त होण्याच्या मार्गावर,पाश्चिमात्य संस्कृती ला वाव


प्रतिनिधी:प्रवीण जोशी,
ढाणकी


एकेकाळी प्रातःकाळी वासुदेव आला वासुदेव आला ही धून कानावर यायची. व तेवढ्याच प्रेम व सद्भावनेने लोक वासुदेव आला म्हणत फिरणाऱ्या लोकांची वाट पाहत असत.स्त्रिया आरतीचे ताट घेऊन येत असत व पूजा करत असत परंतु आता ही धून सद्य परिस्थितीत ऐकू येत नाही.तर ही धून आता आहे तरी कुठे तर ते म्हणजे वासुदेव आला हो वासुदेव आला हरिनाम बोला व हरिनाम बोला जागं येणारा हा वासुदेव आता उपजीविकेसाठी गावाकडून शहरात स्थलांतरित झालाय. डोक्यावर मोरपंख असलेली टोपी आणि विशिष्ट प्रकारचा अंगावरचा पोशाख, एका हातात चिपळी व दुसऱ्या हातात टाळ, सुमधुर आवाजात अभंग व भजन वाजवीत अंगणात वासुदेव आलेला असायचा. पूर्वीच्या काळी वासुदेवाच्या साहाय्याने छत्रपति शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या घरी निरोप पाठवले जायचे. तसेच वासुदेवाचा हेरगिरीसाठी उपयोग करून शत्रूंच्या गोटातल्या बातम्याही मिळवल्या जायच्या. पूर्वी काळे वासुदेव आला म्हणणाऱ्या लोकांना आदर व सन्मान मिळत असत. परंतु आताच्या या सद्यस्थितीमध्ये वासुदेव आला म्हणणाऱ्या लोकांना आदर सन्मान न मिळता यांना तूच्छ नजरेने पाहिल्या जाते.त्यामुळे आता आपल्या उपजीविकेसाठी गावाकडून शहरात स्थलांतरित झालाय व त्यांनी वेगवेगळे व्यवसाय व कामे हाती घेतले आहे. त्यामुळे आता वासुदेव आला हो वासुदेव आला म्हणणाऱ्या लोकांची परंपरा लुप्त होत चालली आहे.