राळेगाव तालुक्यात वीजेच्या लपंडावामुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त

सहसंपादक : रामभाऊ भोयर


राळेगाव वीज वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली असल्याचे दिसून येत आहे. राळेगाव वीज वितरण विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या झाडगाव , वाढोणा बाजार, वडकी वीज वितरण विभागाच्या लपंनडावामुळे तालुक्यातील संपूर्ण जनताच त्रस्त झाली असल्याचे दिसून येत आहे.तर तालुक्यातील वीज वितरण विभागाला लपंणडावाचे व गलथान कारभाराचे ग्रहण लागले असून तालुक्यातील संपूर्ण वीज वितरण विभागातील अभियंता हे सुस्त अवस्थेत असल्याचे ग्रामीण भागातील जनतेमध्ये बोलल्या जात आहे. अशा सुस्त वीज वितरण विभागातील अभियंत्यावर कुणाचीच नजर नाही का ? असेही त्रस्त झालेल्या जनतेकडून बोलल्या जात आहे. ही यंत्रणा फक्त लाईट बिल वसुली करण्यापूर्तीच आहे. का ? सदर तालुक्यातील वीज वितरण विभाग हे ग्राहकांना सेवा देण्यात झिरो झाली असल्याचे दिसून येत आहे. या यंत्रणेला उन्हाळभर लोड शेडिंगचे कारण होते. हे जरी खरे असले तरी आत्ता पावसाळ्यामध्ये कोणते कारण आहे ? रात्रीतून चार ते पाच वेळा लाईट जात आहे. कधी कधी तर अख्खी रात्रच तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला अंधारामध्ये काढावे लागत आहे. याचे कारण काय ? संबंधित लाईन म्हणला जर का फोन केला तर त्यांचा फोन लागत नाही. शेवटी नाईलाजाने खाजगी लाईनमन च्या हाताने काम करून घ्यावा लागत असते तोही खाजगी लाईनमन अव्वाच्या सव्वा इतके पैसे असेल तरच बोल नाही तर मी तुमचे काम करणार नाही असे सांगतात शेवटी ना इलाजाने शंभर दोनशे रुपये देऊन त्या खाजगी लाईनमन कडून गावातील कामे करून घ्यावे लागत आहे. कारण शेतकरी शेतमजूर यांच्याकडे नाईलाज असतो परंतु खाजगी लाईनमनच्या हाताने काम करत असताना त्याला कमी अधिक झाल्यास याला जबाबदार कोण ? कारण ग्रामीण भागात ८० टक्के खाजगी लाईनमनच्या हाताने सध्याच्या परिस्थितीमध्ये राळेगाव तालुक्यात कामे करून सुरू आहे. सदर पावसाळ्यामध्ये तरी कमीत कमी रात्रीच्या वेळेस लाईट असणे आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे रात्रीच्या वेळीच सरपटणारे जीव जंतू रात्रीच्या वेळेस निघत असतात अशा अंधाराच्या वेळेस एखाद्या सरपटणाऱ्या जीवाकडून शेतकरी शेतमजुरांना कमी अधिक झाल्यास याला जबाबदार कोण? सबंधित अधिकारी की लाईनमन ? असेही तालुक्यातील ग्रामीण जनतेमध्ये बोलल्या जात आहे. राळेगाव तालुक्यातील वीज वितरण विभागातील सुस्त यंत्रणेला जागे करून ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर यांना कमीत कमी रात्रीच्या वेळेस तरी लाईटचा पुरवठा करण्यात यावा व वीज वितरण विभागातील सुस्त अधिकाऱ्यावर व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या ग्रामीण भागातील जनतेकडून होताना दिसत आहे.