चहांद येथे नांगरणी करतांना जमिनीतून निघाली पूरातन महादेवाची शिवलिंग

सहसंपादक -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील चहांद येथे शेतात नांगरणी करतांना पुरातन महादेवाची पिंड जमिनीतून निघाल्याने हे अवशेष पाहण्यासाठी गावातील बघ्यांची गर्दी झाली हाेती.
विलास ज्ञानेश्वर हिवरे रा.चहांद हे दि ७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ च्या दरम्यान गावालगत असलेल्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करीत होते,शेतात नांगरणी करतांना अचानक जमिनीखाली पुरातन महादेवाची शिवलिंग आढळली
त्यामुळे ते महादेवाची पुरातन शिवलिंग बघायला गावातील नागरिकांनी आज सकाळी हिवरे यांच्या शेतात प्रचंड गर्दी गर्दी केली होती.या शिवलिंग बद्दल विलास हिवरे यांचेकडून अधिक माहिती घेतली असता त्यांनी शेतात आढळलेल्या शिवलिंग बद्दल हा चमत्कार असून,त्या मिळालेल्या महादेवाच्या पुरातन शिवलिंग ची माझ्या शेतातच प्राण प्रतिष्ठा करून मंदिर बांधणार असल्याचे सांगितले.