
सहसंपादक : रामभाऊ भोयर
अखिल भारतीय सरपंच परिषद चे वतीने १६ ऑगस्ट २४पासुन बेमुदत ग्रामपंचायत बंद आंदोलन व २८ ऑगस्ट २४ला मुंबई येथे होणार्-या सरपंच मोर्चा काढण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायत चे अधीकार संपविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे .१५लक्ष पर्यंत ची कामे ग्रामपंचायत ने करण्यावर आलेली स्थगिती ,१५ वित्त मधुन करण्यात येणार्-या कामासंदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या नविन आदेशानुसार अधिकारी सांगितलं तिचं कामे व त्यांनी ठरवले त्याच कंत्राटदार, पुरवठादार यांचेकडून करावे लागणार आहे.पुढिल काही दिवसांत सरपंच व ग्रामपंचायत चे अधिकार अतिशय मर्यादित राहणार आहे.सरपंच ,उपसरपंच सदस्य मानधनात वाढ करणे, विमा लागु करणे, विभागीय पातळीवर सरपंच आमदार असावा.तसेच ईतर महत्त्वाच्या मागण्या या आंदोलनात करण्यात येणार आहे.या आंदोलनाची तयारी म्हणून विदर्भातील प्रत्येक तालुक्यात बैठक घेण्यात येणार आहे.आज राळेगाव व बाभुळगाव येथे सरपंच परिषदेचे विदर्भ सल्लागार प्रा.कराळे, ऍड . देवा पाचभाई, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष सुधीर पाटील जवादे राळेगाव तालुका अध्यक्ष ईंदल राठोड, बाभुळगाव तालुका अध्यक्ष सुधीर कडुकार,व मोठ्या संख्येने सरपंच उपसरपंच उपस्थितीत.बैठक घेण्यात आली.
