(प्रतिनिधी प्रवीण जोशी)
एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण अगदी थाटामाटात साजरा करीत असताना 9 ते 17 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन गावागावांमध्ये केल्या जात आहे त्यामुळे उत्सवाचे वातावरण निर्माण झाले पण ढाणकी गावातील भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड चे नेटवर्क गेल्या दोन दिवसापासून बंद अवस्थेत आहे तसेच कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती नसताना बीएसएनएलचे नेटवर्क का बंद पडते हा एक संशोधनाचा विषय बनला आहे तसेच ढानकीच्या बीएसएनएल च्या कार्यालयात वास्तुदोष आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना व गावकऱ्यांना पडतो आहे
4g च्या नेटवर्कचे गाजर दाखवून सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी कंपनी खेळताना दिसत आहे किंबहुना याला माकड चेष्टा सुद्धा म्हणायला हरकत नाही कितीही बातम्या टाका आमचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही असे सध्या तरी यांच्या तत्पर सेवा मिळत असलेल्या सेवेमुळे दिसत आहे व ग्राहकांना येड्याची समज फड्याने काढल्याचा अनुभव येतो आहे ग्राहकाकडे इतर नेटवर्कचा पर्याय असल्यामुळे बीएसएनएलच्या असण्या नसण्याने काहीही फरक पडत नाही परिणामी तक्रारीचा पाढा वरिष्ठा पर्यंत पोहोचत नाही अधिकाऱ्यांना वाटते सगळे काही सुरळीत आणि आलबेल आहे पण वास्तवात परीस्थिती वेगळी आहे खरोखरच दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल की एकेकाळी भारतातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या भारतीय दूरसंचार यासारख्या कंपनीची सेवा ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना बंद स्वरूपात असते
