
केंद्र सरकार द्वारे शासकीय यंत्रणेचा गैरवापर
( )
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नामदार नवाब मलिक साहेब यांच्या विरोधात सूडबुद्धीने राजकारण करत केंद्रातील भाजपा सरकारने शासकीय यंत्रणेचा गैरफायदा घेत त्यांच्याभोवती ई.डी.चा फास आवळला आहे. या दडपशाहीचा निषेध नोंदविण्यासाठी राळेगाव तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आज दिनांक २८ फेब्रुवारीला उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्यावतीने महामहिम राष्ट्रपती महोदय भारत सरकार नवी दिल्ली यांना सदर ई. डी. ची कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी, व अशा प्रकारच्या कारवाया बंद करून विरोधी पक्षातील राजकारण्यांमध्ये केंद्र सरकारद्वारे करण्यात येत असलेल्या बेकायदेशीर कारवाई व महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना टारगेट करण्याचा कट थांबवावा. यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद फुटाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शशिकांत ऊर्फ बाळू धुमाळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनोद काकडे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रदीप ठूणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश खुडसंगे, शिवसेनेचे शहर अध्यक्ष राकेश राऊळकर, राळेगाव नगर पंचायत चे नगराध्यक्ष रवींद्र शेराम, राळेगाव नगरपंचायत चे उपाध्यक्ष जानराव गिरी, उपशहर प्रमुख संदीप पेंदोर, नगरसेवक दिलीप दूदगीकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रसाद ठाकरे, दिलीप कन्नाके, इम्रान पठाण, दीपक महाजन, बी. यु. राऊत सर, वृषभ पुरोहित, आशिष रुईकर, तानबाजी चिंचोळकर, प्रवीण झाडे, शंकर गायधने, पीयूष ठाकरे, दिनेश दांडेकर, ज्ञानेश्वर वनस्कर, दिलीप नरुले, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
