यवतमाळ येथे आंबेडकरी कलावंत चळवळीचे महानायक श्रध्देय वामन दादा कर्डक ह्यांच्या 101 व्या जयंती निमित्य जिल्हा स्तरावर जयंती महोत्सव

सहसंपादक : रामभाऊ भोयर

महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने आयोजित करण्यासाठी समितीच्या समस्त पदाधिका-यांची सभा दि.20 ऑगष्ट 2023 रोज रविवारला सकाळी 11:00 वा.लाॅर्ड बूध्दा विहार येथे समितीचे विदर्भ प्रमूख मा.मनोहर शहारे ह्याचे अध्यक्षते मधे आणि ॲड.श्याम खंडारे प्रदेश महासचीव ह्याचे मार्गदर्शनामधे आणि मा.डाॅ.मदन वरघट जिल्हा प्रमूख (पूर्व विभाग) मा.कैलास जाधव सर जिल्हा प्रमूख(पश्चीम विभाग)ह्यांचे प्रमूख ऊपस्थितीमधे संपन्न होत आहे
कार्यक्रमाची संयोजन समिती,
अध्यक्ष,स्वागताध्यक्ष,ऊदघाटक,प्रमूख अतिथी,ई.प्रभृतीची नावे ठरविणे,
जिल्ह्यातील सर्व धर्मीय ,सर्व कला प्रवर्गातील 101 कवी,गायक कलावंत,साहित्यीक यांचा विशेष पूरस्काराने सत्कार ,जिल्ह्यातील वृध्द कलावंत शासकीय मानधन घेत असणा-या सर्व कलावंताचा जिवन गौरव सत्कार,तसेच ‘क’ वर्गीय मानधन घेणा-या कलावंताना ‘ब’ वर्ग स्तरीय मानधन मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यास मार्गदर्शन तसेच जिल्ह्यातील ज्या वृध्द कलावंतानी मानधन प्रस्ताव सादर केलेत त्यांच्या मंजूराती साठी मा. पालक मंत्री ह्यांची भेट घेवून निवेदन सादर करणे.ई बाबत नियोजन ठरविण्यात येत आहे.
ह्या सभेला न चूकता समस्त कलावंतांनी ऊपस्थीत राहावे. असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.