बाजार उमरी येथे मटका व अवैध धंदे यांच्या कडे मांडवी पोलीस स्टेशन चे दुर्लक्ष

वार्ताहर/प्रतिनिधी : गजानन पवार सारखनी

कोरोना संसर्ग पसरू नये या साठी प्रशासना कडुन वेळो वेळी ताळे बंदी करून अन्य उपाय योजना राबवल्या जात आहे
पण त्यात काही ठिकाणी प्रशासकीय नियम मोडत काही भागात खुले आम मटका व जुगार अड्डे सुरू असल्याचे देखील पाहायला मिळत आहे

बाजार उमरी मांडवी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे गाव असून येथील व्यापार पेठ मोठी मानली जाते प्रशासकीय आदेशा नुसार शालेय विद्यार्थी घरूनच अभ्यास करत असल्यामुळे विध्यार्थ्यांना बाहेर बाजार पेठेत ये जा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत आहे
पण गावातच सुरू असलेले जुगार व मटका अड्डे यांच्या कडे शालेय विद्यार्थी वळत असल्याचे धक्का दायक बाब पालकांच्या लक्षात आली
पालक या नात्याने उमरी बाजार येथील संजय पवार यांनी पोलीस स्टेशन मांडवी येथे तातडीने तक्रार दाखल करून संबधित मटका व जुगार अड्यावर कारवाई करण्याची मागणी केली