
पोंभूर्णा तालुका प्रतिनीधी:- आशिष नैताम
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण सोहळा ग्राम पंचायत बोर्डा बोरकर येथे साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ . रोहिणी राकेश नैताम सरपंच ग्राम पंचायत बोर्डा बोरकर,किशोर ठेंगणे ग्रामसेवक, प्रमुख पाहुणे गजानन गेलकिवार पोलिस पाटील, कल्पना शेडमाके ग्राम पंचायत सदस्या, वैशाली कुभरे ग्राम पंचायत सदस्य, शोभा नैताम अंगणवाडी सेविका गावातील बचत गट महिला व सत्कार मुर्ती रत्नमाला राजेराम देवगडे व लिनाताई विजय नैताम उपस्थित होते. गावातील दोन महिलांचा सत्कार करण्यात आला व पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक कुणघाटकर संघनक परिचालक, तसेच रविंद्र भट व उमेश सिडाम ग्राम पंचायत कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
