दिड कोटी रुपयांच्या अद्यावत अग्निशमन वाहनां साठी नगर पंचायत राळेगांव चा सातत्याने पाठपुरावा?

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

दिड कोटी रुपयांच्या अद्यावत सर्व साहित्यासह अग्निशमन वाहनां साठी नगर पंचायत राळेगांव सातत्याने पाठपुरावा करत असल्याची माहिती उपनगराध्यक्ष जानराव गीरी यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना दिली आहे.
तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी ११ मे २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ ला दिलेल्या पत्रात केली आहे.
यंदाचा उन्हाळा बघता आणि राळेगांव शहराचा वाढता व्याप बघता अग्निशमन वाहनांची नितांतगरज आहे. नगर पंचायत राळेगांव करता एक सुसज्ज अग्निशमन वाहन सर्व साहित्यासह खरेदी करणे आवश्यक आहे.
हे डिझाईन,कंन्स्ट्रक्शन,फेब्रिकेशन,इरेक्शन,टेस्टिंग ॲन्ड कमीशनिंग ऑफ फायर फोम टेंडर ऑन 16 टन जी.व्ही.डब्ल्यू. बी.एस.सिक्स या चॅसीस वर उभारणी करण्या साठी येणारा अपेक्षित खर्च दिड कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी कारण जर आगजनी ची दुर्घटना घडली तर आजूबाजूच्या नगर परिषदे तून पाचारण करावे लागते व यासाठी बराच कालावधी लागत असल्याने आगीचा प्रकोप वाढतो,व वित्तहानी सोबत च जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व बाबी लक्षात घेऊन अग्निशमन वाहनांची बांधणी करण्यासाठी दिड कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी विनंती नगर पंचायत राळेगांव च्या वतीने प्रशासना कडे केली आहे हे विशेष…..

अहो आश्चर्य चं अभ्यासू आमदार साहेबां ना हे ज्ञात चं नाही का ?
दिवाळी लक्ष्मी पूजना चे रात्री शहरातील क्रांती चौकातील दोन दुकानाला मोठी आग लागली पंचवीस लाख रुपयांचं नुकसान झाले आहे.
या साठी सांत्वना पर भेटी साठी भाजपाचे विद्यमान आमदार आले होते. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी अग्निशमन वाहनांची मागणी केली होती. नगर पंचायत राळेगांव ने ठराव घ्या वा प्रत्यक्ष भेट आणि प्रयत्न करतो असे प्रतिपादन केले.
आणि या साठी पाठपुरावा नगर पंचायत राळेगांव ने पाच महिन्या आधीच केला हे अभ्यासू आमदारांना माहिती नसावं या विषयी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.