
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील झरगड येथे दिनांक 23/2/2026 रोज सोमवारला दुपारी ठिक दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अचानक पावसाचे वातावरण तयार झाले असता झरगड येथील चंद्रभान पचारे यांच्या शेतात मजूर शेतीकाम करत असताना विजांचा गडगडाट आणि पाऊस सुरू झाला त्यामुळे शेतातील सर्व लोकांनी झाडाचा आश्रय घेतला असता त्या झाडाजवळ विज पडून त्यामध्ये दोन पुरुष आणि तीन स्त्रीया गंभीर जखमी झाले.ही बातमी शेजारच्या शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना कळली असता गावातील लोकांनी एक किलोमीटर अंतरावरापर्यंत उचलून आणले त्यांनतर वाहनाद्वारे ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथे उपचार करण्यात आले.त्यातील काही जखमी गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील वसंतराव नाईक रुग्णालयात पाठविण्यात आले त्यामध्ये स्वतः शेतकरी चंद्रभान पचारे,त्यांचे साडू गणेश नान्हे गाव कात्री, शेतात कापूस वेचणीसाठी आलेल्या महिला विमल पदिले, वंदना पदिले, सुनिता राऊत अशी नावे असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे कळले असून जखमीना अँंबुलसद्धारे यवतमाळ येथे रवाना करत असताना तहसिलदार भोईटे यांनी रुग्णालयात येऊन विचारपूस केली त्यावेळी त्यांच्या सोबत गजानन लढी,मोहन आत्राम सर तसेच अनेक तरुण, गावकऱ्यांनी एकच गर्दी केली असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
