
आदिवासी समाजाची
जिल्हास्तरीय बैठकीत निर्णय
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
आदिवासी समाजामध्ये कोणतीही जमात समावेश करू नये यासाठी आदिवासी समाजाची जिल्हास्तरीय बैठक २१ सप्टेंबर २०२५ रोजी स्थानिक वाघापूर येथील बिरसा भवन येथे आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हा स्तरावर आयोजन करण्यात आली होती.
या सभेच्या अध्यक्षस्थानी आदिवासी समाजातील तपस्वी योगाचार्य दशरथजी ताडाम होते. या सभे करता जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील अनेक आदिवासी बंधू भगिनी आलेले होते.
सर्वप्रथम आदिवासींमध्ये घुसखोरी करणाऱ्या आणि नव्याने आदिवासी होऊ पाहणाऱ्या समाजाला कुठल्याही परिस्थितीत या जमातीला स्थान नाही असे सर्वानुमते ठरविण्यात आले. आधीच आदिवासी समाजामध्ये गैरआदिवासी नौक-या बळकावल्या आहे. आदिवासी समाज आता अन्याय सहन करणार नाही. अशा स्वरूपाच्या तीव्र भावना समाज बांधवांच्या होत्या. बंजारा समाजाच्या घुसखोरी निषेधार्थ महाराष्ट्र मोठे आंदोलन करण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला.
सरकार ने कोणत्याही जमातीला अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करू नये या मागणीसाठी येत्या १० ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य आदिवासी समाजाचा आक्रोश क्रांती महामोर्चाचे आयोजन करण्याचे आयोजन करण्यात आले.
या सभेमध्ये सर्व समाजाच्या वतीने आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीचे गठन करण्यात आले.
सर्वानुमते
आदिवासी बचाव कृती समितीचे अध्यक्ष म्हणून राजूभाऊ चांदेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच इतर ही पदावर पदाधिकाऱ्यांची निवड या सभेमधूनच करण्यात आली. यावेळी राजूभाऊ चांदेकर यांनी आदिवासी आक्रोश क्रांती महामोर्चा मध्ये जिल्ह्यातील सर्व आदिवासी जमातीतील बांधवांनी सहभागी व्हावे अशी आव्हान त्यांनी केले. आपल्या आरक्षणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य असून ती सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले.
यावेळी ॲड प्रमोद घोडाम,राजु मडावी,सुरेश कन्नाके, भिमराव खारोडे,किरण कुमरे,मधुसूदन कोवे,संदीप पेंदोर,डॉ मधुकर मडावी,डॉ मोहन गेडाम, अरविंद केराम,राहुल सोयाम, होमदेव कन्नाके, रमेश भिसनकर,संतोष पारधी,शंकर मडावी,महेश कुमार सिडाम यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी समाजातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते डॉक्टर्स वकील शिक्षक साहित्यिक विचारवंत आदिवासी संशोधक सामाजिक कार्यकर्ते आदिवासी सेवक तसेच अनेक आदिवासी संघटनांचे सर्वच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
