
सहसंपादक :: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या दहेगाव येथे दि 20/3/2025 पासून श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताह श्रीमद् भागवतचार्य ह.भ.प.रमेशपंतजी आखरे महाराज यांच्या समृद्ध वाणीतुन सुरू आहे आज दि 24 मार्च 2025रोजी दुपारच्या सत्रात गोवर्धन पर्वत पुजन आयोजित करण्यात आले सदर पुजनासाठी गावातील गोमाता यांना सजवून आणण्यात आले व भगवान श्रीकृष्ण सर्व गोकुळवासी यांच्या वेशभूषा गावातील लहान मुलांनी साकारली होती विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पासून सर्व गोमाता यांना घेऊन गावातील पुरुष महीला तरूण मुले लहान मुले यांनी वाजत-गाजत नाचत शाळेच्या पटांगणावर गेले व त्या ठिकाणी गोवर्धन पर्वत पुजन व गोमाता पुजन ह .भ प. रमेशपंतजी आखरे महाराज यांच्या हस्ते पुजन करण्यात आले व गावातील सर्व महिला मंडळीने पुजन केले या उत्सवात मोठ्या संख्येने सर्व दहेगाव वासी सहभागी झाले होते