मेट गावातील नाईक प्रेमसिंग मंगल सिंग राठोड कारभारी मोहन कनि राम राठोड असामी थावरा भिकू चव्हाण होळी निमित्त गावामध्ये पोस मागणे ही प्रथा बंद करण्याचे नियोजन


उमरखेड तालुका प्रतिनिधी(ग्रामीण ) : विलास टी राठोड


उमरखेड तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मेट या गावाचे मानकरी म्हणून ओळखले जाणारे नाईक प्रेमसिंग मंगलसिंग राठोड कारभारी मोहन कनिराम राठोड असामी थावरा भिकू चव्हाण असे तीन मानकरी मानले जातात व आज रोजी होळी निमित्त त्यांनी एका जागी बसले असता त्यांनी एक मेकांशी चर्चा केली आणि एक मेकांना सांगितले बंजारा समाज हा आपला प्रचिन काळापासूम दर्याखोऱ्यात राहणारा हा एक बंजारा समाज आहे आपण आपल्या बांजरा संस्कृती नुसार होळी सण व इतर अनेक सण आपण आपल्या पद्धतीने साजरा करतो पण या होळी सनामध्ये मला पोस मागणे म्हणजे पैसा घरोघरी फिरून मागणे ही प्रथा मला आगळीवेगळी दिसते पोस मागणे ही प्रथा भीक मागणे हीझाली आहे भीक मागणे बंजारा समाजामध्ये मला वेगळीच दिसून येते म्हणून ही प्रथा आपण गावाचे मानकरी नाईक कारभारी आणि असामी बंद करू ढालिया किंवा दपडी वाजक म्हणून नेमलेले आहे याना पोस मागण्याचा अधिकार असतो किंवा शोभतो पण आपल्या बंजारा समाजामध्ये पोस मागणे ही प्रथा योग्य नाही म्हणून आम्ही गावातील नाईक श्री प्रेमसिंग मंगल सिंग राठोड कारभारि मोहन कनि राम राठोड व असामी थावरा भिकू चव्हाण आम्ही ही प्रथा बंद करण्याचे ठरविले आहे तसेच निवेदन केले आहे