
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगांव तालुक्यातील सावरखेडा येथे 7 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान कुमारी श्रावणी राहुल शिंदे वय 3 वर्ष घरासमोरील जीर्ण इमारती जवळ खेळत असताना अचानक पिल्लर अंगावर पडल्याने श्रावणीला तात्काळ करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात गावातील तरुणांनी हलविण्यात आले होते. परंतु जखमी झालेल्या श्रावणी राहुल शिंदे वय तीन वर्षे हिला करंजी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्याकरिता आणले असता रुग्णालयातील डॉक्टर सलाखा यांनी तपासणी करून श्रावणीला मृत घोषित केले. राहुल शिंदे हा सावरखेडा येथील सासुरवाडी ला गुरुदास मेश्राम यांचे घरी राहून शेतमजुरी करून पत्नी, मुलगी, मुलगा, परिवारा सह उदरनिर्वाह करीत असताना कुमारी श्रावणी अपघाती मृत्यू झालाने शिंदे परिवारावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला असून सावरखेडा येथे शोकाकुल वातावरण पसरले आहे..
