
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
ग्रामपंचायत, श्री गुरुदेव सेवा मंडळ, विघ्नहर्ता मंडळांव नवसंकल्प बहुउद्देशिय संस्था राळेगांव यांचे संयुक्त विद्यामाने ह यांच्या संयुक्त विद्यमाने राळेगाव शहराजवळ असलेल्या भाम (५ सप्टेंबर ) रोजी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राळेगाव परिसरातील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, भारताचे स्वातंत्र्याचा ७५ या सुवर्ण अमृत महोत्सवानिमित् गौरी गणेशत्सव शिक्षकदीन यांचे औचित्य साधुन “महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय तथा अनुसंधान केंद्र सालोड (हि.) वर्धा व ग्रामपंचायत श्री गुरुदेव सेवा मंडळ विघ्नहर्ता मंडळ भांब आणि नवसंकल्प बहुउदेशिय संस्था यांचे वतीने नितीन झाडे सदस्य ग्रा. पं. भाव तथा अध्यक्ष राळेगांव तालुका कल्याणकारी असोशियन युनियन यांचे पुढाकाराने “सर्व रोगनिदान व आयुर्वेदोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.
भांब येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन सकाळी ९ वाजता होणारं आहे. या उद्घाटन सोहळ्यास तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भांब आणि तालुक्यातील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व आरोग्य तपासण्या करता याव्यात, असलेल्या आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात डोळ्यांचे विकार, अस्तीरोग, ह्रदयविकार, बालकांच्या विविध आजारांबाबत तपासण्या व उपचार केले जाणार आहेत. तालुक्यातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळ, विघ्नहर्ता मंडळांव नवसंकल्प बहुउद्देशिय संस्था राळेगांव यांच्या वतीने करण्यात आले आहे.