भाजपा कार्यकर्त्यां कडुन सवना येथील दारू जप्त मात्र दारू विक्रेता फरार .

हिमायतनगर प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी


हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना येथे रात्री १० च्या सुमारास दारु विक्रेत्यांवर भाजपा युवा सर्कल प्रमुख प्रमोद भुसाळे व त्याचे सहकारी मित्र यांच्या मदतीने मोठी कारवाई करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून दारु मोठ्या जोमाने विकत असल्याने गावातील महिलानी एकत्र येऊन गावचे सरपंच गोपतवाड साहेब व ग्रामपंचायत मध्ये निवेदन देवून दारु बंद करण्याची मागणी केली होती तरी त्यांच्यावर कोणताही परिणाम झाले नसल्याने महिलांनी हिमायतनगरपोलिस सहायक निरीक्षक महाजन साहेब यांना भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी यांच्या समोक्ष निवेदन दिले गेले तरी दारु विक्रेत्यांवर मात्र कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही पुन्हा दारु विक्री जोरात सुरू झाली यांना कोण खतपाणी घालत आहे कोणाच्या जोरावरच हा विक्रेता दारु विकत यांना का चोप बसत नाही असे प्रशन सवना परिसरातील नागरीकान मध्ये चर्चा होताना दिसत होती अवैध धंदे करण्यास मनाई असताना देखील दारु विकण्यासाठी प्रवाणगी दिली कोणी हे भाजप कार्यकर्त्यांनी विचारले असता तर त्याच्या सोबत अरेरे रावीची भाषा केली लगेच दुसऱ्या दिवशी भाजपा युवा मोर्चा सर्कल प्रमुख प्रमोद भुसाळे व त्याचे मित्र यांनी दारु विक्रेत्यांवर नजर ठेवून त्याला दारुच्या बाटल्या सहित पोलिसांच्या हवाली करण्याचे ठरविले पण दारुचा एक बाक्स जप्त केला पण आरोपी हातांवर तूरी देवुन पळाला त्याचा पोलिस तपास करीत आहेत पण असे अजुनही ग्रामीण भागातील काही दारु मोठ्या प्रमाणात चालू झाली आहे असे कार्यकर्ते निर्माण करुन पोलिस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी भाजपा युवा मोर्चा सर्कल प्रमुख प्रमोद भुसाळे यांनी आज पत्रकार यांच्याशी बोलताना केले आहे.