धक्कादायक : 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या ,कारण अद्याप अस्पष्ट

वरोरा शहरातील चिरघर प्लॉट या भागातील रहिवासी असलेला गणेश मधुकर भाकरे वय वर्ष 23 या तरुणाने एकार्जुना चौक जवळ असलेल्या रेल्वे खाली येत आत्महत्या केल्याची घटना घडली. मित्राला भेटून येतो असे सांगून गणेश घराबाहेर पडला त्यानंतर एकार्जुना चौकाजवळ असलेल्या पेट्रोल पंप जवळच्या रस्त्यावर दुचाकी ठेवून रेल्वे रुळाकडे गेला असल्याची माहिती मिळाली. गणेशच्या कुटुंबात आई व दोन बहिणी असल्याची माहिती मिळाली.गणेश ची आई वरोरा येथील एका खासगी शाळेत काम करीत असल्याची माहिती आहे. गणेश हा नागपूर येथे शिक्षणासाठी राहत होता .आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट.रेल्वे पोलीसानी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली व शव उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.या घटनेचा तपास वरोरा पोलीस यांच्याकडे आहे.