
–
सप्टेंबर ०१, २०२३
- घरी जातो, चाय पिऊन लगेच येतो, असे म्हणणाऱ्या त्या तरुणाचा…
- कायर- मुकुटबन रस्त्यावरील पठारपूर फाट्यावर भीषण अपघात..
झरी : तालुक्यातील डोंगरगाव येथील शालेय शिक्षकांची गाडी घेऊन नितेश अरुण ढोके नामक व्यक्ती घरी चाय पिण्याकरता गेला परंतु शिक्षकाला कुठलीही कल्पना न देता सदर कायर येथे मध्य प्राशन करण्याच्या हेतूने गेलेल्या त्या इसमाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की ,भरधाव दुचाकी चालवण्याचे नाद तरुणात दिसून येत आहे. घरी चाय पिऊन येतो म्हणून डोंगरगाव येथील तरुण एका शिक्षकाची गाडी घेऊन गेला व शिक्षकाला कुठलीही कल्पना न देता कायरला मद्य प्राशन करण्याच्या हेतूने गेला असता त्या इसमाचा भयंकर अपघात मुकुटबन – कायर मार्गावरील पठारपूर फाट्यावर झाल्याची घटना आज दिनांक १/९/२०२३ रोजी दुपारचे अंदाजे ३ वाजताच्या दरम्यान घडली. सदर व्यक्ती अंदाजे ३० वर्षीय तरुणाची दुचाकी थेट उभ्या असलेल्या आयशर वाहनावर धडकली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात हलवले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.
नितेश अरुण ढोके असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो डोंगरगाव (कोसारा) येथील निवासी होता. घरून चाय पिऊन येण्याच्या नादात शिक्षकाचे पॅशन दुचाकी क्रमांक MH-29-BX-1893 मागितली आणि कायर ला गेला. परतीच्या वाटेवर असताना कायर जवळील वळणावर दुचाकी उभ्या आयशर ट्रकला धडकली, अपघात भीषण होता, स्थानिक नागरिकांनी जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवले. आणि घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळावर पोहचले असून जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी चंद्रपूर ला हलविण्यात आले आहे. या प्रकरणी शिरपूर पोलीस पुढील तपास करीत आहे.
