महावीर जिनिंगला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान

सहसंपादक -रामभाऊ भोयर

राळेगाव येथील मेठीखेडा रोडवर असलेल्या महावीर काटन जिनिंग प्रेसिंग मध्ये अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागून लाखो रुपये किमतीच्या रेचा मशीनचे नुकसान झाल्याची घटना आज दिं १ एप्रिल २०२३ रोज शनिवारला सायंकाळी पाचच्या वाजताच्या दरम्यान घडली असून वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
महावीर जिनिंग चे मालक मनोज झांबड यांचा महावीर कॉटन जिन असून या जिन मध्ये शंकर फायबर,व महालक्ष्मी जिनिंग या दोन खरेदीराची खरेदी सुरू होती. मात्र रुई काढण्याच्या शेड मधील रुई काढण्याचे काम सुरू असताना अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असून या आगीत मशीन मधील रेचा मशीन रोल बेल्ट इलेक्ट्रिकल वायरिंग सेन्सर्स आणि बॉक्स आगीत जळून खाक झाले असून या लागलेल्या आगीत वीस ते पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहेत मात्र आग लागतात असलेले येथील कामगार प्रसंग वधान राखून जिनिंग मधील आग रोखण्याचा प्रयत्न केला तसेच आग विझवण्यासाठी पाण्याचे टँकर बनवण्यात आले व त्यानंतर यवतमाळ येथील अग्निशमन दलाच्या वाहनांना बोलाविण्यात आले त्यामुळे आग आटोक्यात आली असून मोठा अनर्थ टळला आहे.