
प्रतिनिधी//शेख रमजान
आज दररोज च्या जीवनात तडजोड , पदरमोड , उच्च तत्व ला फाटा , नीतिमत्तेचा अभाव , सौजन्य , प्रामाणिकपणा बघायला मिळत नाही कारण प्रचंड व्यवहार वादी जग एवढा गतिमान झालं आहे की,त्याला वेळ नाही कि हे प्रामाणिक आहे कि बेइमानिचे . जग निष्ठूर ,भेसुर झालं आहे आज हर छोट्या माशास मोठा मासा गिळंकृत करते अशी विचार फोफावत चालले आहे पण जगात असे ही लोक आहे की,प्रामाणिकपणा प्राण कंठाशी आले तरी सोडणार नाही .तसेच एक प्रत्य
ढाणकी मध्ये बघायला मिळाला आहे.
याबाबत अधिक माहिती शी, इरफान शेखजी शेख दै सायरन प्रतिनिधी ढाणकी,
हे उमरखेड वरून आपले काम करून रात्री ला ढाणकी कडे वापस येताना यांचे पाकीट उमरखेड ढाणकी रोड वर रात्री 12ते 01च्या दरम्यान पडले होते अशी माहिती त्यांनी सोशिअल मीडिया वर टाकली होती की,त्या मध्ये त्यांचे ओरिजनल कागदपत्रे आहेत. त्याच दिवशी गणपत बाबुराव कवडे रा बिटरगाव,भाजीपला विक्रेते हे बिटरगाव येथून उमरखेड मंडी मध्ये जात असताना रात्री 2 वाजता हरदडा देवस्थान जवळ रोड वर पर्स सापडला असता त्यांनी त्यातील आधार कार्ड वरील नाव व माहिती वाचून तो ढाणकीतील नागरिकाच आहे कळताच त्यांनी त्यांची ओळख असलेल्या ढाणकी मधील बशीर भाई ईट वाले यांना कॉल करून कळवले कि या नावाचे डॉकॉमेन्ट व 2440 रुपैसे असलेले पाकीट सापडले आहे तुम्ही ओळखता का?बशीर भाई ने त्यांची मदत करत इरफान शेखजी शेख यांना फोन करून आपल्या घरी बोलवून त्यांचा पर्स वापस केला.गणपत बाबुराव कवडे यांच्या या प्रामाणिक पणाचा सध्या समाज माध्यमातून कौतुक करण्यात येतंय.
