
भाषण आणि निबंध स्पर्धा मधील विजेत्यां विद्यार्थीना बक्षीस व उपहार देऊन केला गौरव
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश हायसकुल व कनिष्ट महाविद्यालय, राळेगाव येथे 14 सप्टेंबर ला राष्ट्रीय हिंदी दिना निमित्त विविध उपक्रम शाळेत आयोजित करण्यात आले होते. त्या अंतर्गत शाळेतील 110 विद्यार्थी हिंदी निबंध स्पर्धा व भाषण स्पर्धा या शासन उपक्रमात सहभागी होऊन त्यानीं आपली भूमिका तसेच कार्यक्रमाचे शेवटी हिंदी भाषण स्पर्धा मध्ये सहभागी विध्यार्थी मधून प्रथम क्रमांक कु. त्रिशा आष्टकार, द्वितीय क्रमांक कु.वैष्णवी पन्नासे, तृतीय क्रमांक कु. राधिका राऊत, कु. प्रीती निखाडे यांना तर निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक कु. सुहाना गहलोत ,दितीय क्रमांक अनुष्का गोरे, तृतीय क्रमांक प्रिती निखाडे यांना उपहार व बक्षीस देऊन गौरवण्यात आले. त्याच प्रमाणे हिंदी दिनाच्या निमित्त विद्यार्थ्यांना हिंदी दिनाचे महत्व याबद्दल शिक्षकांनी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे वेळी प्राचार्य जितेंद्र जवादे,उपप्राचार्य विजय कचरे,पर्यवेक्षक सुरेश कोवे, तर परीक्षक राजेश काळे, करुणा महाकुलकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद चिरडे,नितीन जुनूनकर, प्रफुल्ल चांदेकर,आनंद घुगे, प्रवीण कारेकर, मंचावर उपस्थित होते.तसेच हिंदी दिनाच्या यासर्व उपक्रमास शाळेतील शिक्षक सूचित बेहरे,निलेश गोरे,संजय चिरडे,वैशाली चौधरी,अनुजा गेडाम ,रेश्मा भोयर,जया ठवरी, विनोद तायडे, सचिन दहिकर,प्रतीक ताकसांडे, निलेश उमरे, मंगेश मेश्राम,अमोल चिरडे,आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विदयार्थ्यांनी यावेळी मोठा प्रतिसाद दिला.
