राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
केवळ आत्महत्या ग्रस्त विध्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन शब्दाच्या बोलान सात्वन करून हा प्रश्न सुटणार नाही तर शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल करून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या आर्थिक जाचातून सोडविण्याचा प्रयत्न शासन स्तरावरुन होणे गरजेचे आहे. सरपंच उमेश गौऊळकार रिधोरा
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथिल २० वर्षिय विध्यार्थी अनिकेत अशोक निडगुरवार यांनी बडनेरा येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
सविस्तर वृत्त असे १ एप्रिल रोजी रिधोरा येथील विद्यार्थी अनिकेत अशोक निरगुडवार वय २० वर्ष हा बडनेरा येथे माझी मंत्री यांचे कॉलेज वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फुड टेक्नॉलाजी महाविघालय बडनेरा येथे बी. टेक च्या अंतिम वर्षाला शिकत होता. त्याच्या घरची हालाकीची परिस्थिती असल्याने कॉलेजची फि भरायला थोडा वेळ झाला यात अनिकेतचा अंतीम वर्षाचा पेपर चालु असतांना कॉलेज मधील शिक्षकांनी कॉलेजची फी भरण्यासाठी तगादा लावून धरल्याने अनिकेतने आत्महत्या केली असल्याची तक्रार अनिकेतचे वडील अशोक निडगुरवार यांनी बडनेरा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. अनिकेत हा हळव्या मनाचा असल्याने त्या गोष्टीचा त्याला पश्चाताप आला व अनिकेतने टोकाची भूमिका घेऊन १ एप्रील रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर शिक्षणाच्या बाजारी करणाने अनिकेतचा बळी गेला आहे.सदर महाविद्यालये मुलांना आपल्या मुलभूत हक्का पासून दुर ठेवण्याचा गुन्हा करीत आहे. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणच घ्यावे अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे. घरी अठरा विसावे दारिद्रय असुन सुध्दा ग्रामीण भागातील होत करू विध्यार्थ्यां मिळेल ते काम करुन आपला शिक्षणाने दर्जा उंचावण्याचा आटो काट प्रामाणिक पणे प्रयत्न करीत आहे. परंतु महाविद्यालयाची लाखो रुपयांची फी पाहून विध्यार्थ्यांच्याच नव्हे तर आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येत. शिक्षण आणि आरोग्या सारख्या क्षेत्राच बाजारीकरण करून शासन आपल्या जबाबदारी तुन मुक्त होवू पाहत आहे. ग्रामीण भागातील मुलांना आपल्या हक्का पासून दुर ठेवण्याचा प्रयत्न जाणून बुजुन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाविद्यालयाची भरभक्कम फी पाहता उच्च शिक्षण हे केवळ आर्थिक परिस्थितीने भक्कम असणाऱ्या वर्गाचे असुन ते गोरगरीबाचे राहिलेले नाही. तसाही यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्या मुळे ओळखला जात असून पुढे हाच जिल्हा शेतकऱ्यांच्या व गोरगरीब बापाच्या मुलांचा आत्महत्या गस्त जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख होणार यात तिळमात्र शंका नाही. असी भीती गावकरी व्यक्त करीत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी मंत्री असतांना त्यांनी मटले होते की भारतातल्या तमाम मंदिराची संपत्ती जप्त करून शेतकरी, गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करा या विचारावर कृती करण्याची वेळ आली आहे. आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्या महाविद्यालयावर कठोर कारवाई करणे व आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्या प्राध्यापकावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून अशी महाविद्यालय तात्काळ बंद करण्याची मागणी रिधोरा येथील गावकरी करीत आहे. शिक्षण क्षत्रात पुन्हा पावित्र्य निर्माण करायचे असेल तर असी महाविद्यालय आपल्या अधिपत्याखाली घेऊन ग्रामीण भागातील मुलांना न्याय द्यावा असे मत गावातील सरपंच उमेश गौऊळकार, ह.भ.प. नामदेवराव वाढंई महाराज, पोलीस पाटील ढगेश्वर मांदाडे व गावकरी यांनी व्यक्त केले आहे
