
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
यवतमाळ अर्बन बँकेने भारतातील सैनिकांना मदत म्हणून बँकेच्या वतीने बँकेच्या प्रत्येक शाखेत सैनिकनिधी जमा करण्याचा उपक्रम सुरु केला होता. ह्या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे व मोठा निधी सैनिकांना प्राप्त व्हावा ह्यासाठी बँकेतील सर्व शाखेत सैनिकनिधी दानपेटी ठेवली होती. त्या मध्ये अपेक्षित निधी जमा होतच होता, हा उपक्रम ढाणकी येथील प्रतिष्ठित व्यापारी विक्रम वर्मा, रोहित वर्मा यांना आवडला. त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकाकडे सैनिक निधी आमच्या भगवती ट्रेडर्सकडून जमा करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यांच्या विनंतीला मान देऊन बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भगवती ट्रेडर्सला सैनिक निधी जमा करण्याची पेटी छोटेखानी कार्यक्रमात दिली होती.या उपक्रमात संपूर्ण वर्मा परिवाराने तनमनधनाने सहभागी होऊन ५४८०० रुपये नगदी व दोन हजाराचे विदेशी चलन असा सैनिक निधी,यवतमाळ अर्बन बँकेच्या व्यवस्थापकाला सुपूर्द केला. यवतमाळ अर्बन बँकेच्या वतीने मोठा सैनिक निधी जमा करून दिल्याबद्दल भगवती ट्रेडर्सचे संचालक, विष्णुदास वर्मा, विक्रम वर्मा व भाजपचे महामंत्री रोहित वर्मा यांचे आभार मानले. तसेच भगवती ट्रेडर्सला सैनिक निधी जमा करून दिल्याबद्दल यवतमाळ अर्बन बँकेच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करणार आहेत.
