दहेगाव ते राळेगाव बस सेवा सुरू

राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे अनेक वर्षे पासून बंद असलेली बस आज दि.३ जुलै पासून सुरू झाली सकाळी ११ वाजता व सायंकाळी ५ वाजता दहेगाव गावात बसचे आगमन झाले बस आल्यामुळे गावकऱ्यांना खुब आनंद झाला बस नसल्याने गावकऱ्यांचे खुब हाल चालू होते पण आता ती समस्या राहिली नाही तसेच बसचे पुजन करून चालक व वाहक यांना नारळ पान देऊन स्वागत करण्यात आले, त्यावेळी,कवडुजी मांडवकर, ग्रामपंचायत सदस्य दहेगाव, रामदासजी परचाके, अरूणराव चटकी, शंकर पंधरे तालुकाध्यक्ष ट्रायबल फोरम राळेगाव, जयपाल पेदोंर, प्रदीप गायकवाड, संतोष जुमनाके, विठ्ठल चव्हाण, पुंजाराम धनरे,व गावकरी उपस्थित होते.