
सहसंपादक : रामभाऊ भोयर
रावेरी येथील सितामाता मंदिराच्या पटांगणात नुकत्याच नंदी पोळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नंदी सजावटीमध्ये पहिल्या क्रमांकाचे बक्षीस राम काकडे यांना मिळाले, तर चेंडू धावपट्टी स्पर्धेत श्रीकांत कुमरे यांनी पहिला क्रमांक पटकावला. संगीत खुर्ची स्पर्धेत संकेत भोयर यांनी बक्षीस मिळवले. मुलींच्या स्पर्धेतही बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील भाऊ आष्टकर यांनी केले. मुलं आणि मुलींच्या निवडीसाठी उपसरपंच श्री. गजानन राव झोटिंग, पोलीस पाटील पुरूषोत्तम काकडे, मोहनराव खारकर, गणेश जामुनकर, तात्याजी बोभाटे, खुशाल शिंदे या मान्यवरांनी सहकार्य केले.
बक्षीस वितरण डॉक्टर गोहणे साहेब आणि नामदेवराव काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन तन्मय काकडे, नकुल शेंडे, पियुष काकडे, अनुज काकडे, रुषभ काकडे, आकाश काकडे, साहील मोहीते, अथर्व काकडे, रोषन मोहीजे, मोहीत जुनगरे, ओम शेंडे या बाल मंडळींनी केले.
या कार्यक्रमाला गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.
