
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणारे निंगनूर येथील सैनिक सचिन भोळे व निंगनूर अंतर्गत येणारी नागेशवाडी येथील मुंबई येथे पोलीस दलामध्ये निवड झालेले प्रल्हाद केशव जाधव यांचे सपुत्र ज्ञानेश्वर जाधव यांनी निंगनूर व नागेशवाडी या गावाचे नाव रोशन केले व आज दिनांक 15/ऑगस्ट निमित्त त्यांनी निगणूर ग्रामपंचायत येथे झेंडा वंदन केले. निंगनूर येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व सरपंच यांनी सुद्धा दोन्ही देश भक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
