जि. प. उच्च प्राथमिक शाळा येवती येथे प्रजासत्ताक दिन साजरा

सहसंपादक: रामभाऊ भोयर

दि.26.1.2024 रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साईनाथजी भोयर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायतचे सरपंच मा. श्रीरामजी सोयाम व किसनराव कोल्हे (व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष )हे होते. कार्यक्रमामद्धे सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण श्रीरामजी सोयाम (सरपंच )व आशिषभाऊ पारधी (उपसरपंच )यांच्या हस्ते करण्यात आले व नंतर शाळेचे ध्वजारोहण सर्वप्रथम महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन किसनराव कोल्हे व (सैनिक सचिनभाऊ नन्नावरे यांनी करून साईनाथजी भोयर (अध्यक्ष )यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.नंतर शाळेतील विद्यार्थ्यांची सुंदर अशी भाषणे घेण्यात आली. शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आली यामध्ये बक्षीसांचे प्रावीन्य मिळवून आपापली कला सादर केली. व नंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आला व नाष्टा देण्यात आला नाश्त्याची व्यवस्था युवा परिवर्तन मित्रमंडळातर्फे करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये सर्व प्रतिस्थीत व्यक्ती व सर्व कर्मचारी वृंद,मुख्याध्यापक श्री. शिंदे सर, बोदाडे मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन माकोडे मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक श्री चालखुरे सर यांनी केले व आभार प्रदर्शन केले त्यानंतर सायंकाळी ठीक 7:00वा सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला गावातील सर्व लोकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आनंद व्यक्त केला.