इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, राळेगाव येथील मुलींच्या हॅन्डबॉल संघाची राज्यस्तरावर भरारी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, राळेगाव येथील हॅन्डबॉल संघाने बुलडाणा येथे आयोजीत शालेय विभागीय स्तरावरील स्पर्धेत दिनांक 10/10/2023 प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरावर भरारी घेतलेली आहे. सदर विद्यार्थीनी कु. नंदिनी भगत, कु. राधिका राऊत, कु संस्कृती झलके, कु तनु काकडे, कु. समिक्षा राऊत, कु खुशी उरकुडे, कु तनुश्री खेलपांडे, कु. पायल पेंदाम, कु. निकिता आडे, कु साक्षी शेंडे, कु. श्रावणी सातपुते, प्रशिक्षक रवि भूषणवार व प्रा. डॉ किरण पवार यांच्या अविरत प्रयत्नात्ला घवघवीत यश प्राप्त झाले त्याबददल त्यांचे कौतुक होत आहे. त्याबददल संस्थेचे अध्यक्ष प्रा. वसंतराव पुरके कनिष्ठ महा. प्राचार्य निमसडकर, वरिष्ठ महा प्राचार्य संतोष आगरकर, प्रा. बारहाते, प्रा. डाखोरे, प्रा. आडे, प्रा. मुडे मॅडम, प्रा. उताणे मॅडम, प्रा. वनस्कर मॅडम, अमोल ताकसांडे व भोजराज कुमणे या सर्वांनी मुलांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.