
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
कपाशी पीक परिस्थितीची तसेच कीड रोग प्रादुर्भावाची पाहणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांनी दिं ४ नोव्हेंबर २०२२ रोज शनिवारला सोनुर्ली येथे विनोद उईके यांच्या शेतात जाऊन कपाशी पिकाची पाहणी केली. यावेळी कपाशी पिकांची पाने लालसर येवून सुकत असून दहिया रोग व किडीचा प्रादुर्भाव दिसताच उपयोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी तसेच अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी यावेळी केले आहे.
कपाशी पिकामध्ये दही आहे किंवा पानावरील पांढरे तांबे डाग या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय या रोगाची बीजे जमिनीत पडलेल्या रोग रोगट अवशेषांमध्ये सुप्त अवस्थेत राहतात त्याकरिता एकात्मिक व्यवस्थापन अशा पद्धतीने करावे (१) प्रादुर्भावग्रस्त पिकाचे अवशेष जळून नष्ट करावेत (२) नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा तसेच पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असताना फवारणी द्वारे नत्र खते देऊ नये(३) रोगाचा जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास अझोक्सीस्ट्रोबिन १८.२% डब्ल्यू डब्ल्यू + डाय फेनोकोना झोल १९.४ % डब्ल्यू डब्ल्यू एस सी. १ ग्रॅम किंवा क्रेसोझीम मिथाईल ४४.३ % एस सी १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावे.
