
सहसंपादक : रामभाऊ भोयर
अज्ञात वाहनाने दुचाकी चालकाला मागाहून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला झाला.अपघाताची ही घटना आज बुधवार दिनांक 4 जून रोजी सकाळी ७.३० च्या दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक ४४ वरील वर्धा नदीच्या पुलावजवळ घडली.
योगेश रामराव निकोडे वय 25 वर्ष राहणार सायखेडा तालुका केळापूर असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.
योगेश हा आपल्या दुचाकी क्रमांक एम एच ३२ टी ७३५१ ने हिंगणघाट कडून वडकी मार्गे येत होता. दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक 44 वरील कारेगाव येथील वर्धा नदीच्या पुलाजवळ अज्ञात वाहन चालकाने त्याच्या दुचाकीला मागाहून जोराची धडक दिली यामध्ये योगेशच्या डोक्याला तोंडाला व हाता पायाला मार लागून तो गंभीर जखमी झाला घटनास्थळावर लगेच एन एच आयची चमू दाखल झाली व जखमीला पुढील उपचारार्थ वडनेर येथे हलविण्यात आले आहे.