खैरगाव कासार जि. प. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वरध केद्रातिल जि.प.शाळा खैरगाव कासार येते प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच माणिकराव किन्नाके उद्घाटक खुळे काका प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा करिश्माताई किन्नाके, उपसरपंच प्रशांत लाकडे, गजानन ढाले,शितलताई लाखू,अनंता वाघमारे, धनराज लाकडे, लक्ष्मण लाकडे, गजानन कानोडे तसेच दडपापुर शाळेचे शिक्षक शंकर माहुरे सर इत्यादी उपस्थित होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमात शेतकरी नृत्य, आदिवासी नृत्य,तेलगु गीत, मराठी सिनेगीत,भिमगित,लावणी यांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले.यावेळी तालुका स्तरीय स्पर्धेत बक्षिस मिळालेल्या खेडाळूना ट्राफी देउन सन्मान करण्यात आले.कार्यक्रमाच्या बक्षिसासाठी राजु उरकुडे तर स्टेज साठी अमोल मेसेकर,राजेश नारनवरे, अरविंद लाखू व व्हिडीओ शुटींग करिता धृप जावलेकर व समस्त शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच समस्त ग्रामस्थांनी बालकलाकाराचे कौतुक करुन बक्षिसाचा वर्षाव करत कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे संचालन कसरेवार सर , प्रास्ताविक ठावरी सर,आभार प्रदर्शन भेदोडकर सरानी केले