सहसंपादक : रामभाऊ भोयर
आचार्य विनोबा भावे, प्रवरसेन राजा व पुरातन काळातील असलेले प्राचीन शिव मंदिर यांच्या पावन पदस्पर्शाने झालेल्या पवनार नगरीची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती गाजली आहे
या परिसरात दूर दुरून भाविक व पर्यटक धाम नदी तीरी येवून भेट देतात.
परंतु आजच्या आधूनिक युगात सुरू झालेल्या या सोशल मीडियाने तरुण तरुणीच्या डोक्यात प्रेमाची वासना जागृत झाली या मुळे तरुण तरुणी आपल्या पाल्याची इजत रस्त्यावर घालवता दिसून येऊ लागले आहे.
वर्ध्यातील एक तरुण जोडपी पवनार परिसरातील नाग टेकडी परिसरात दुपारच्या सुमारास फिरावयास आले होते परंतु गावातीलच काही युवकांकडून तरुणास विहरीत ढकलून मुलीवर अतिप्रसंग करण्यात आला होता त्या पश्यात 2017 साली सकाळी 10 वाजताच्या सुमारास वर्ध्यातील एक 17 वर्षीय वर्षीय तरुणी व 22 वर्षीय तरुण याने आपल्या प्रेयसीला भेटण्याकरिता पवनार परिसरातील नंदखेडा मागील भागात बोलाविले होते त्या वेळेस मुलाने आपल्या प्रेयसी कडे प्रेम जागृत करून शरीर सुखाची मागणी केली होती मात्र मुलीने नकार देताच तरुनाकडून वाद करून युवकाकडून त्या तरुणीच्या पोटात चाकू भोसकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला तर पवणार हायवेवरील मोठ्या पुलावरून उडी मारून व तिलाही ढकलून जीवनाशी ठार करण्याचा बेत त्या तरुण युवकाकडून करण्यात आला होता हा सगळा तमाशा अर्धा तास सतत सुरू असल्याने मुलीने आरडा ओरड करताच पवनार सेवाग्राम विकास आराखड्यातील कामावर असलेले नानाजी भुरे यांनी नागरिकांना बोलावून मुलीचा जीव वाचविला इतकेच नव्हे तर अचानकपणे गस्तीवर असलेले सेवाग्राम पोलीस एएसआय प्रकाशजी लसूंते यांनी रक्तबंबाळ झालेल्या तरुण युवती आटो मध्ये बसवून तरुणीस प्राथमिक उपचाराकरिता सेवाग्राम हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले व तरुणास अटक करण्यात आली होती.
तर 2021 साली पवनार येथील भोईपूर्यतील सतीश जोगे नामक युवकाकडून सुधा अश्याच प्रकारे प्रेम वासनेच्या भारत त्याच वॉर्डातील अल्पवयीन मुलीचा खून करू मृतदेह कील्या मागील भागात पुरविण्यात आला होता घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रम्हणे साहेब यांनी आरोपी सतीश जोगे यास अटक करून आरोपीस गजाआड केले अजूनही त्या आठवणींना न विसरताच पुन्हा एकदा त्याच आठवणींचा उजाळा होणार तर नाही ना अशी भीती ग्रामस्थांकडून व्यक होताना दिसून येत आहे परिणामी आश्रम परिसर व नंडिखेडा भागात सुरक्षा रक्षक देण्याच्या मागणीला जोर धरू लागला असल्याने प्रशासन या व लोक प्रतिनिधी या कडे लक्ष देणार किं नवा वणवा पेटण्याची वाट बघत बसणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
