राळेगाव : मतदारराजा जागा हो लोकशाहीचा धागा हो , राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मतदार लोक जागृती

सहसंपादक : रामभाऊ भोयर

मतदान आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे
आणि प्रत्येक मत अमूल्य आहे .त्यामुळे एका मताने सुध्दा निवडणूक निकालावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे जबाबदारी आहे आपली लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावं यासाठी राळेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात मतदान लोक जनजागृती धागा फाउंडेशनच्या माध्यमातून केली जात आहे.
जन मनाचा पुकार मतदान आपला अधिकार , मतदान आपला अधिकार आपली जबाबदारी आणि त्यामुळे चांगले लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी मोठ्या संख्येने मतदार राजाने मताधिक्य बजावलं पाहिजे यासाठी धागा फाउंडेशन च्या वतीने गाव खेड्यांमध्ये आता मतदार जनजागृती केली जाते आहे. प्रत्येकाने मतदानासाठी वेळ काढला पाहिजे . त्यामुळे येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी पहिले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे म्हणजे मतदान करावं आणि नंतर इतर काम करावे असेही या माध्यमातून सांगितले जात आहे
आणि त्याला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळतोय. राळेगाव तालुक्यातील शेळी,कोपरी,आपटी, वालदुर, इंझापुर या भागात जनजागृती केली जात आहे आणि पुढेही धागा फाउंडेशन जिल्ह्याच्या अनेक गाव खेड्यामध्ये अशाच पद्धतीचे मतदार लोक जागृती करणार आहे
.