माझी शाळा, सुंदर शाळा ‘ या सह विध्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी प्रयत्न करा
-राजूभाऊ काकडे ( गशिअ )
(जि. प. शाळा वालधुर येथे शिक्षण परिषद संपन्न )

सहसंपादक : रामभाऊ भोयर

    ' 

विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास हे ध्येय ठरवून आपल्याला पुढे जायचे आहे. ‘माझी शाळा, सुंदर शाळा ‘ या सह शासनाच्या विविध महत्वाकांक्षी उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा, माझा शिक्षक, शिक्षिका या दिशेने निश्चितच वाटचाल करतील असा आशावाद गट शिक्षणाधिकारी राजूभाऊ काकडे यांनी व्यक्त केला. जि. प. प्राथमिक शाळा वालधुर येथे आयोजित शिक्षण परिषदेत मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. या वेळी सरपंच मोहन नरडवार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अबोलीताई उईके, वि. अ.नवनाथ लहाने, निलेश दाभाडे, सेवा निवृत्त गशिअ चंद्रभान शेळके यांचे सह मान्यवर उपस्थित होते.
शैक्षणिक सत्र सन 2024-25 या सत्रातील अंतर्गत केंद्राची पहिली शिक्षण परिषद दि. 6 ऑगस्ट 2024 रोजी वालधूर येथे आयोजित करण्यात आली होती.
सत्कार सोहळा, मार्गदर्शन, शैक्षणिक उपक्रम त्यांची अंमलबजावणी, अध्यापनातील अडचणी उपाय, विविध उपक्रम आदी विषयावर या शिक्षण परिषदेत विचारांचे आदान -प्रदान झाले.निलेश दाभाडे, नवनाथ लहाने
लक्ष्मण ठाकरे के.प्र.अंतरगाव
यांनी मनोगत व्यक्त केले
शिक्षण परिषद तासिका नियोजन
शुभदा येवले यांनी अंत्यत मोलाचे मार्गदर्शन केले.
PAT अंतर्गत भाषा गणित व इंग्रजी विषयावरील
कृति आराखडा तयार करणेबाबत
सविस्तर माहिती दिली.
गायकवाड सर*- PAT अंतर्गत
*भाषा गणित आणि इंग्रजी*विषयातील
गुण भरण्याबत माहिती.
शुभदा येवले यांनी
*बहु वर्ग अध्यापन पद्धती*
अध्ययन अध्यापन प्रक्रीयेचे चे व्यस्थापन
विद्यार्थ्याना आव्हाने देणे.
विद्यार्थ्याना अध्ययनात गुंतवून ठेवणे
व नवोपक्रम
सोनाली उमप यांनी
TLM साहित्याचा वापर
ठाकरे सर यांनी
प्रशासकीय बाबींवर मार्गदर्शन
सूत्रसंचालन-शुभदा येवले यांनी तर *आभार प्रदर्शन-सोनाली उमप यांनी केले. केंद्रातील शिक्षकवृंद उपस्थित होते.