
सहसंपादक: रामभाऊ भोयर
महसूल विभागाच्या वतीने राळेगाव तालुक्यातील जळका येथे दिनांक १४ जुलै २०२५ रोज सोमवारला छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडले असून या शिबिरात जवळपास ७०० दाखल्याचे वितरण करण्यात आले आहे
मौजा जळका येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे प्रांगणात महसूल मंडळ झाडगाव यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन सकाळी ११:०० वाजता सरपंच जळका तसेच प्रतिष्ठित शेतकरी यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली
. सदर शिबीरात, आरोग्य विभाग, पंचयत समिती, कृषी विभाग,आधार केंद्र, सेतु सुविधा केंद्र, पुरवठा विभाग आदी विभागातील तहसील कार्यालय राळेगांव तसेच महसूल मंडळ झाडगाव येथील सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी शासनाच्या विविध सेवा व योजना करीता आवश्यक दाखल्याचे वितरण केले.
सदर शिबीरात जळका व परिसरातील जवळपास ४५० शेतकरी व नागरीक सहभागी झाले होते
सदर शिबीर मा. सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी, राळेगाव व मा. अमीत भोईटे तहसीलदार राळेगांव यांचे मार्गदर्शनात घेण्यात आले. सदर शिबीरास उपस्थित नरेंद्र हलामी निवासी नायब तहसिलदार राळेगांव यांच्या उपस्थितीत दाखल्याचे वितरण करण्यात आले असून या शिबीरात ७०० विविध प्रकारचे दाखले वितरीत करण्यात आले असून सदर शिबीर यशस्वी करण्याकरीता महसुल मंडळ झाडगांव मधील ग्राम महसुल अधिकारी रुपेश चचाणे, अनिल ओंकार कु. पुजा मडावी, कु. जयश्री गेडाम, कु कल्याणी-चांदेकर व कु तेजस्वीनी दुमणे व मंडळ अधिकारी महेंद्र देशपांडे यांनी परिश्रम घेतले.
सदर शिबीराचा समारोप सायंकाळी ६.०० वाजता परिश्रम घेतले. उपस्थीतांचे आभार मानून करण्यात आला.
