
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
ढाणकी येथे भाकड व थकलेली जनावरांचे जतन व संवर्धन होऊन ती टिकली व वाचली पाहिजे संस्कृती आणि त्या मागील असलेल्या रुढीपरंपरा याचा वसा येणाऱ्या काळात टिकून राहावा व भारतीय वंशाची गावरान गाय हे शेतकऱ्यांच्या शेतीला व समाजात सुद्धा तिची उपयुक्तता मोठ्या प्रमाणात असताना गोशाळा तर उभारले गेली. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या जनावरांना चारा उपलब्ध करणे सोपे नव्हते. भाकड असलेल्या जनावरांची आभाळ होत असताना त्यांची कत्तलखान्याकडे सुद्धा रवानगी होत असल्याचे ऐकिवात होते. तेव्हा गोशाळे बरोबरच चारा टंचाई दूर होणे हे जिकीरीचे बनले. सनातन धर्मीय गाईला मातेची उपमा देऊन तिला पूजनीय मानतात तसे बघता यांत्रिकीकरणामुळे दिवसेंदिवस जनावरांची संख्या घटत चाललेली आहे ज्याच्याकडे जास्त शेती आहे असे शेतकरी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे विकायची काय या हेतूने ज्या गाई ने आपले बरेच काही गोधन दिले काही पैशात काय विकायचे म्हणून काही शेतकरी गो शाळेत गायींना आणून सोडतात व त्यांचे उर्वरित गुजरान आयुष्य व्यवस्थित होईल व गावरान गाईचे जतन आणि संवर्धनही होईल हा त्यामागील हेतू. पण हे करत असताना सगळ्यात मोठी बाब म्हणजे चारा टंचाई आणि खाद्य उपलब्ध करण्यासाठी गोभक्त पुढे आले अशक्य आहे ते शक्य करण्याची क्षमता हे तरुणाई मध्ये असते आणि तेच काही तरुणांनी करून दाखवले त्यात देवा देवकते, परमेश्वर निमलवाड, शिवा गिरी, विनायक अक्कावार, प्रफुल नंदनवार, दिनेश फुलेवार, राहुल यदलेवाड या तरुणांनी कर्म सत्यात उतरवले
एक वेळ व्यक्ती जे घडेल ती रक्कम काही क्षणात देऊन मोकळी होईल पण कधी कधी रक्कम देऊ सुद्धा काही बाबी उपलब्ध होत नव्हत्या ते म्हणजे कुटार, कडबा पण गोभक्त असलेल्या तरुणांनी संकल्प केला तो म्हणजे गोशाळेला मोठ्या प्रमाणात खाद्य टंचाई न होऊ देण्याचा व हा वसा त्यांनी हाती घेतला खरा पण ते तेवढेच खर्चिक होते त्यांनी याबाबत एक अनोखी शक्कल लढवून मात केली ते स्वतः कडबा कुटार व इतर शेतकऱ्यांच्या शेतातील खाद्य स्वतः भरून खर्च बचत करत व लागत असलेल्या खर्च भागवून त्यांनी “ना नफा ना तोटा”केवळ श्रमदान या तत्त्वावर मोठ्या प्रमाणात खाद्य टंचाई असताना ती खादय टंचाई दूर करून विपुल प्रमाणात गोशाळेला खाद्य उपलब्ध करून दिले.
कहता है इतिहास यहा पर! दूध की नदिया बहती.. थी!
हरे बरे इस देश मे जनता! सदा सुखमे रहती थी!
मगर आज खाने, को मिलती ना रोटी!
दूध दही माखन की, आशा ही झुटी!
यहा पर करोडो कटती है गैय्या!
कैसे खुश रहेगा इसमे कन्हैया!
इस दुनिया का खेल खिलोना! सब है उनके हाथ में!! जमाने मे बदल आजकल पड रहा है! जरा गौर से देखो तो सब पाप बढ रहा है!!
पूर्वजांनी ऋषीमुनींनी सुद्धा गाईच्या दुधाची कीर्ती तत्कालीन काळात सांगितली आहे पंचगव्य अर्थातच दूध दही तूप गोमूत्र आणि शेण यांचे धार्मिक महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे कोणताही विधी असो संस्कार हे पंचगव्या शिवाय पूर्ण होत नाही म्हणून खऱ्या अर्थाने या तरुणांनी जे कार्य हाती घेतले ते वाखाण्याजोगेच आहे
