
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव ग्रामीण : राळेगाव तालुक्यातील वडकी येथील स्मॉल वंडर हायस्कूल आणि ज्यु.कॉलेज मध्ये चार दिवसीय चित्रकला ,, हस्तकला , विज्ञान प्रदर्शनी घेण्यात आली. सोबतच भित्तीचित्र स्पर्धाही घेण्यात आली .वृक्षारोपण व संवर्धन ,व्यसनांचे दुष्परिणाम भारतीय संस्कृती दर्शन ,राष्ट्रीय एकात्मता, प्रेरणादायी व्यक्तिमत्व, निसर्ग समतोल ,मोबाईल एक व्यसन हे विषय देण्यात आले होते .किमान 350 कलाकृती सादर करून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.संस्थेच्या वतीने दरवर्षी समाज कार्य करणारे मान्यवरांना जीवनव्रती पुरस्कार देण्यात येतो यावर्षी आनंदवन वरोरा येथील समीक्षा लेखक कवी व सामाजिक कार्यकर्ते दीपक शिव सर यांना तसेच माजी इंडियन एअर फोर्स सार्जंट राजेंद्र प्रसाद सध्या सेंट्रल बँकेत वडकी कार्यरत मान्यवरांना जीवनव्रती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले समाज कार्यकर्ते संजय भाऊ काकडे व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रीतीताई काकडे यांनीही प्रदर्शनाला भेट दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अजिंक्य भारत वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी व पत्रकार कैलास भाऊ कोडापे, अमोल भाऊ सांगानी तरुण भारतचे पत्रकार यांनीही प्रदर्शनास भेट दिली पंचायत समिती राळेगाव शिक्षण विभाग प्रभारी विस्तार अधिकारी हरिदास वैरागडे तसेच वडकी विभाग केंद्रप्रमुख विशाल किन्नाके यांनीही प्रदर्शनास भेट दिली परिसरातील शाळा व विद्यार्थी कन्या शाळा यांनी उत्साहाने प्रदर्शनाची पाहणी केली एकंदरीत 400 कलाकृतींचे सादरीकरण करण्यात आले होते शेवटच्या दिवशी पालकांनी प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांना अभिनंदन केले माजी विद्यार्थी राधिका बांगरे प्रेरणा मोहता यांनीही प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला .कलाशिक्षक पुष्पक मोहरले यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ मंजुषा सागर, अहमद शेख ,शंकर मालखेडे विज्ञान प्रदर्शनीसाठी मार्गदर्शन करणारे नितीन गवळी, विजय फुलकर, शननो शेख, रूपाली दहिवलकर ,अक्षय वानखेडे सर्व शिक्षकांनी प्रदर्शनात मोलाची भूमिका पार पडली. प्राचार्यांनी सर्वांचे अभिनंदन व कौतुक करून विद्यार्थ्यांना पदक देऊन सन्मानित करून कार्यक्रमाची सांगता झाली.
