
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील न्यू इंग्लिश
हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एनएमएमएस आणि सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. या विद्यार्थ्यांचा न्यू एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या सचिव डॉ. अर्चना धर्मे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी जीवनात यशाने हुरळून जाऊ नये आणि पराभवाने खचू नये. प्रयत्न करणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन डॉ. अर्चना धर्मे यांनी यावेळी केले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रतीक दारव्हेकर, धनवंती ढुमणे, देव्यानी राऊत, पूर्वा घोटेकार, आयुष कोहड, श्रावणी भोरे, श्रेया झाडे, अक्षरा उमाटे यांचा समावेश
आहे. एमएमएमएस शिष्यवृत्ती केंद्र सरकार पुरस्कृत आहे. यामध्ये पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये याप्रमाणे चार वर्षे शिष्यवृत्ती दिली जाते. सारथी शिष्यवृत्तीकरिता तीन विद्यार्थी पात्र ठरले आहेत. सत्कार प्रसंगी मुख्याध्यापक विजय कचरे, उपमुख्याध्यापक सुरेश कोवे, पर्यवेक्षक सूचित बेहरे, एनएमएमएस परीक्षा प्रमुख आनंद घुगे, प्रवीण कारेकर आदी उपस्थित होते. मागील अनेक वर्षापासून या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त करून शिष्यवृत्तीचे मानकरी ठरत आहेत. वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन, प्रोत्साहन यामुळे विद्यार्थी यश मिळवित आहेत.या उत्तीर्ण विद्यार्थीचे शाळेतील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे…
