बोर्डा झुल्लुरवार ग्राम पंचायतवर कमळ फुलले,सरपंचपदी सौ. संगीता राकेश गव्हारे तर उपसरपंचपदी अमोल काशीनाथ बुरांडे विराजमान

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम

पोंभूर्णा तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बोर्डा झूल्लूरवार ग्राम पंचायत वर भाजपानी एकहाती सत्ता स्थापन केली असून सरपंचाची निवळ थेट जनतेमधून असल्यानी भाजपाचे सौ. संगीता राकेश गव्हारे यांना जनतेनी कौल देत ग्राम पंचायतच्या संरपच पदावर विराजमान केले या निवडणुकीमध्ये भाजपाचे सहा सदस्य विजयी झाल्याने उपसरपंच पदाचा मार्गही मोकळा झाला त्यामूळे उपसरपंच पदावर भाजपाचे अमोल काशीनाथ बुरांडे यांची अविरोध निवड करण्यात आली बुधवार दिनांक ११/०१/२०२३ ला सरपंच व उपसरपंच तथा सर्व विजयी सदस्य यांनी ग्राम पंचायत कार्यालयात उपस्थीती दाखवून पदभार स्वीकारला यावेळेस ग्रामसेवक कडूकर साहेब, निवडणूक अधिकारी मेश्राम, नायब तहसीलदार तिराणकर साहेब,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुलभाऊ संतोषवार, पोंभूर्णा नररपंचातचे उपाध्यक्ष अजीत भाऊ मंगळगीरीवार,जनार्धन सातपुते, राकेश गव्हारे, नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते