
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून पणायचा विसर्ग सोडण्यात आला असून अनेक कास्तकारांचे ऊस हे पीक आहे.उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे ऊस पिकाला पाणी आवश्यक असताना तो वाळण्याच्या वळणावर येऊन ठेपलाय असे असले तरी काही शेतकऱ्याचा “हम करेसो कायदा” होत असल्याची चर्चा आहे ‘जीसकी लाठी उसकी भैस” असा कायदा दिसत इथ चालतो??उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून दरवर्षी वेळेच्या वेळेला पाणी सोडले जात असताना यावर्षी पाटबंधारे विभागाची यंत्रणा कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांचे पीक भिजवण्यासाठी संबंधित धरणातून रब्बी व इतर पिके जोपासण्यासाठी त्यांना टप्प्या टप्प्याने पिके जोपासण्यासाठी पाणी सोडल्या जाते.असे असले तरी, काही महारती नी चक्क उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून विसर्ग सोडण्यात येते तिथेच कॅनॉल मध्ये विशिष्ट प्रकारची अडचण बनवून,दगड , ट्रॉली ने आणून पुढे गांजेगाव, सावळेश्वर कडे जाणारे पाणी बंद केल्याची शंका आहे त्यामुळे बाकी कास्तकार पाण्याचा लादलेला कर भरत नाहीत का?असा प्रश्न उपस्थित होतो व ही वस्तुस्थिती आहे पाटबंधारे विभागाला तसे एकट्या शेतकऱ्यासाठी कॅनॉल मध्ये दगड , टाकून पाणी आडवून पाणी घेता येते का?स्वतःच्या शेतीमध्ये आपले पीक भिजऊन, पाण्याचा साठा हा जमिनीची खोली व रुंदीकरण करून पाण्याचा साठा साठऊन ठेवण्यास जमते का? शिवाय प्रत्येक शेतकरी हा आपल्या ईकडे जाणाऱ्या कालव्याकडे कॅनॉल मध्ये माती , दगड पोती टाकून पाणी वळऊन नेऊ लागल्यास वादविवादाला तोंड फुटल्याशिवाय राहणार नाही. अशा या धोरणामुळे शेतकरी त्रस्त झाले असून संबंधित कर्मचारी सुद्धा कुणालाच काही म्हणायला तयार नाहीत. पाटबंधारे विभागाचे कर्मचारी हाताची घडी व तोंडावर बोट ठेऊन बघ्याची भूमिका घेत आहेत??संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांना आपले पीक भिजवण्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रत्यक गेटला आवर्तन सोडल्यास शेतकऱ्यांचा आपआपसात वाद होणार नाही. मात्र कोणताच कर्मचारी पुढे येऊन कॅनॉल मध्ये टाकलेले दगड बाजूला काढत नाहीत संबंधित कर्मचाऱ्यांना कॅनॉल मधील दगड काढण्याचा सुद्धा अधिकार नाही का? संबंधित कर्मचारी मूग गिळून गप्प बसण्याचे नेमके कारण तरी काय?असा सवाल सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या वतीने उपस्थित होत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला टप्प्याटप्प्याने पाणी पोहचत नसल्यामुळे हा वाद निर्माण होत आहे . संबंधित कर्मचाऱ्यांनी गेट बंद करून प्रत्येक गेटला टप्प्याटप्प्याने पाणी सोडल्यास सर्व शेतकऱ्यांचे पीक भिजवले जाईल . परंतु संबंधित यंत्रणा कूचकामी ठरलेली आहे.तरी पाटबंधारे व संबंधित विभागाणे लक्ष देण्याची गरजअसल्याचे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या वतीने बोलल्या जात आहे.
