सैनिक पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक जयंती साजरी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

श्री सत्यसाई बहुउद्देशीय शिक्षण व प्रशिक्षण संस्था संचालित सैनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वडकीच्या वतीने भारतीय असंतोषाचे जनक यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरवात प्राचार्य सचिन ठमके यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला दिपप्रज्वलन व माळ्यारपणाने करण्यात आली.

याप्रसंगी प्रमुख अतिथी प्राचार्य ठमके, अध्यापक व विध्यार्थी यांची लोकमान्य तिलक यांचे शैक्षणिक विचार व कार्य या विषयावर प्रासंगिक व समोयचीत भाषणे झालीत. यामध्ये विध्यार्थी मंथन मानकर व रुद्रा कुरडकर या विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचचे संचालन ईशा ठाकरे यांनी केले. तर श्रुतिका मांदाडे हिने आभार मानले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.