
संग्रहित फ़ोटो
जिल्हा प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
यवतमाळ
सध्या जिकडे तिकडे पक्के रस्ते होत असून ग्रामीण भागातून सुद्धा राष्ट्रीय महामार्ग जात असताना ग्रामीण भागात सुद्धा प्लॉटिंगचे लोन खूप मोठ्या प्रमाणात फोफावले आहे विशेष म्हणजे सामायिक शेती असली आणि त्यास अनेक वारस असल्यास त्या जमिनीचे रूपांतर अकृषक भूखंड म्हणून केल्यानंतर महामार्ग लगत असल्याने त्या भूखंडाला सोन्यासारखा भाव प्राप्त होत असल्याकारणाने अव्वाच्या सव्वा व गडगंज किमतीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालीमुळे भाऊबंदकी व भावा बहिणीमध्ये आर्थिक देवाण घेवाणी वरून गृहकलह होताना दिसत आहे.
तसेच असुवीधायुक्त प्लॉटचे जाळे ढाणकी शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असून प्रचंड प्रमाणात बॅनरबाजी व जाहिरात करून ग्राहकाला सुविधा आहेत असं भासवून ग्राहकाला फसविणारे काही ढाणकी शहरात कमी नाही विशेष करून भूखंड धारकांनी काही समाजसेवकाला हाताखाली धरून हा व्यवसाय चांगला तेजीत आणला भूखंड विकणाऱ्या कडून विकत घेणाऱ्या कडून आकर्षक कमिशन दलाल समाजसेवकाला मिळत असल्यामुळे त्यांची चांगलीच आर्थिक ऊल्लाढाल म्हणजेच “बल्ले बल्ले” होत असून दलाल समाजसेवकाने मात्र सर्व कर्तव्य विसरून आपली आर्थिक भर मोठ्या प्रमाणात कशी होईल अर्थातच “वाढ” कशी होईल एवढे ध्यानात ठेवताना दिसत आहे अशा भंपक आणि मतलबी दलाल समाजसेवकापासून सर्वसामान्य जनतेने सावध अर्थातच “दक्ष” राहायला हवे तसेच मागील काही दिवसापूर्वी पडलेल्या लेआउट मध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही तसेच शहरातील सद्यस्थितीत ले आउट मध्ये स्ट्रीट लाईटची सुविधा नाही आणि आहे त्या ठिकाणीची व्यवस्था रात्रीच्या वेळी बंद अवस्थेत दिसते शहरातील प्लॉटच्या विक्रीची परवानगी देताना मजबूत रस्ते, योग्य निचरा होईल व पाण्याची विल्हेवाट होईल अशा नाल्या स्ट्रीट लाईटची व्यवस्था करून देणे हे लेआउट धारकाचे काम या सुविधा जोपर्यंत पूर्ण करीत नाही तोपर्यंत विकायची परवानगी संबंधित विभाग का देत हा प्रामुख्याने प्रश्न उद्भवतो तसेच ज्या ठिकाणी प्लॉटिंग केलेली आहे अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी लाईट सुविधा नाही त्यामुळे या ठिकाणी कदाचित घातपात सुद्धा होऊ शकतो अशा ठिकाणी सायंकाळी च्या वेळेला युवकांचे जत्थे दिसत असून एखाद्या वेळेस सामाजिक अस्थिरता निर्माण होऊन येणाऱ्या काळात तंटे सुद्धा उद्धभवू शकतात तेव्हा अशा वेळेस या भूखंडाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी लाईट सुद्धा असणे जरुरी आहे तसेच खाजगी ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्या वित्तीय ठिकाणांमध्ये शहरात प्रचंड वाढ होत असून खाजगी वित्तीय ठिकाणाच्या दलालांचा सुळसुळाट झाला आहे विशेष म्हणजे या क्षेत्रामध्ये सुद्धा समाजसेवकांनी मुसंडी मारलेली बघायला मिळत असून कुठे भांडण तंटा निर्माण करायचा किंवा निर्माण झाल्यास तिथं तो तंटा मिटून नायकाची भूमिका बजावून त्यामध्ये आपले घर भरणाऱ्या पोटाडया,अपलपोट्या, विचित्रकार,एक फुल आणि एक हाप समाजसेवकाची काही उणीव नाही तसेच खाजगी वित्तीय ठिकाणी गुंतवणूक करा म्हणणाऱ्या यंत्रणेचा सुद्धा ढाणकी शहरात सध्या बोलबाला दिसत आहे तसेच खाजगी वित्तीय ठिकाणच्या सुटा बुटातील चेल्या चपाट्यांना व्यवस्थितपणे प्रशिक्षण देऊन समोरील व्यक्ती गुंतवणूक कसा करेल याचे गोड बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाते त्यामध्ये निवृत्त कर्मचारी धनाड्यवृद्ध व्यक्ती अशा लोकांना गोड बोलून प्रसंगी त्यांच्या भावनिकतेचा फायदा घेत त्यांचा वाढदिवस साजरा करून गोडी गुलाबीने त्यांच्याकडून गुंतवणूक करून घेण्याची कला वितिय ठिकाणच्या महाठकांना ही कला चांगलीच अवगत असते पण अशा वित्तीय ठिकाणी गुंतवणूक केल्यास ते कधी पोबारा करतील सांगता येत नाही तेव्हा अशा वित्तीय ठिकाणी गुंतवणूक केल्यास येणाऱ्या काळात ढाणकी शहरात सुद्धा फसगत होऊ शकते तेव्हा गुंतवणूक करा योग्य ठिकाणी पण समाजसेवकाला दूर ठेवूनच आणि जास्त व्याज दराच्या मोहाला सुद्धा बळी पडू नये अशा ठिकाणी सुद्धा फसगत होऊ शकते.
