ग्रामीण पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन

राळेगाव पत्रकार संघटना कडून तीव्र निषेध पत्रकार संघाचे तहसीलदार निवेदन..
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ लोकमत वृत्तपत्राचे प्रतिनिधी व जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे सचिव सुरेंद्राभाऊ राऊत यांनी तांदूळ तस्करी चे वृत्त प्रकाशित केल्यामुळे त्यांना रेशन तस्करांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या निंदनीय घटनेचा तीव्र निषेध स्व.पी.एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ यवतमाळ जिल्हा,शाखा राळेगांव तालुका पत्रकार संघाचे वतीने करण्यात आला असून आरोपीला कडक शासन करावे,अशा प्रकारच्या घटना घडू नये याची दक्षता घ्यावी अशा आशयाचे तक्रार निवेदन अध्यक्ष प्राचार्य अशोकरावजी पिंपरे यांचे नेतृत्वात तहसिलदार डाँक्टर रविंद्रजी कानडजे यांना देण्यात आले आहे.
यावेळी प्रकाशजी मेहता,डाॅ.कैलासजी वर्मा,महेशभाऊ शेंडे,फिरोझभाऊ लाखाणी, राजेशभाऊ काळे,मंगेशभाऊ राऊत,संजयभाऊ दुरबुडे,रणजितबाबु परचाके,गुड्डूबाबु मेहता,राष्ट्रपालभाऊ भोंगाडे,रामुभाऊ भोयर,सचिनभाऊ राडे,जावेदभाई पठाण,विलासभाऊ साखरकर,राजूभाऊ काळे,रितेशबाबु भोंगाडे सह अन्य मान्यवर उपस्थित होते..
