
उमरखेड प्रतिनिधी : प्रवीण जोशी.
नगरपरिषद उमरखेडला अनेक स्वच्छतेबाबत उत्कृष्ट पुरस्कार मागील काळामध्ये प्राप्त झालेले आहेत पण आजची परिस्थिती पाहता या पुरस्काराची पूर्णपणे नाचक्की होत असल्याचे उमरखेड शहरात बघायला मिळत आहेत .अनेक प्रभागात असणाऱ्या नाल्या रस्ते सार्वजनिक शौचालय शहरातील मुख्य चौकातील व्यापार संकुल अनेक मोठमोठे रस्ते, नाल्या या आरोग्य विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे सध्याच्या घडीला अस्वच्छतेचे प्रतीक बनल्याचे दिसत आहेत. कचरा (गोळा)संकलनासाठी दिलेले टेंडर 4 कोटी 17 लाख असून ही उमरखेड शहर अस्वच्छच … ?
कचरा गोळा करणारा ठेकेदार हा फक्त मलिदा खाण्यासाठीच आहे की काय ?
फेब्रुवारी 2022 मध्ये शहरातील कचरा (गोळा ) संकलन करण्याचे टेंडर अमरावती येथील ठेकेदार दीपक उत्तराधिकारी यांनी घेतले असून यांचा कचरा संकलन्याकडे अद्यापही लक्ष नसून फकत शहरातील नागरिकांच्या आरोग्याची खेळण्याचे टेंडर यांनी घेतले आहेत ?
नगरपरिषदेत राजकीय सत्ता नसल्याचे गैरवापर घेऊन तेथील कर्मचारी ,अधिकारी व कचरा संकलन संबंधित ठेकेदार ” हम करे सो कायदा ” या वृत्तीने नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे सांगण्यात येत आहे .
कचरा संकलन करणे ही नगरपरिषदचे काम असून शहरातील काही आडेराव, बडेराव यांच्याच कॉलनीमध्ये कचरा ( गोळा) संकलनासाठी त्यांचे वाहन फिरत असतात मात्र गोरगरीब वस्तीमध्ये अद्यापही गाड्या जात नाही.
नाल्या साफ केल्या जात नाही, नाल्या पाण्याने तुंब भरूनही आठ-आठ दिवस नालेसफाईवाले येत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे .
सामान्य नागरिकांकडून घेतलेले कर स्वरूपातील पैसे कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदारांंनांं मलिदा खाण्यासाठी आहे की काय ? असे ही शहरातून बोलल्या जात आहेत . गोरगरीब जनतेचे ४कोटी १७ लाख फक्त कर्मचारी व ठेकेदारांना खाण्यासाठीच आहे का ?
चौकट
नगरपरिषदेचा कारभार प्रभारावरच उमरखेड न.पा ला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळालाच नाही त्यामुळेच अधिकाऱ्यांवर , कर्मचाऱ्यांवर , कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदारावरही मुख्याधिकारी चे वचक राहिले नसल्याचेही सांगण्यात येत आहे .
न पा उमरखेड येथे प्रभारावरच असल्याने कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे .
चौकट :
कचरा गोळा करणारी कुचकामी यंत्रणा
शहरात प्रत्येक वार्डात गल्लीबोळात कचरा गोळा करण्यासाठी एकूण 98 कर्मचारी , 10 टिप्पर ( छोटा हत्ती ) 4 ऑटो ,3 ट्रॅक्टर असूनही न पा पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लोहार पुरा रोडवर कचऱ्याचे ढिगारे साचलेले असतात तरीही न पा कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
