
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
उमरखेड तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या व पैनगंगा अभयारण्यात स्थित मोरचंडी या गावांमधील शेतकरी गोकुळ गणपत जाधव नेहमीप्रमाणे आपली जनावरे आपल्या शेतात बांधून गेले असता रात्रीच्या सुमारास वाघाने शेतामध्ये असलेल्या पाळीव जनावरांवर हल्ला केला यामध्ये शेतकरी गोकुळ गणपत जाधव यांची एक गाय दोन कारवडी तीन गोरे असे एकूण सहा जनावरे वाघाच्या हल्ल्यात दगावली आहेत. वनरक्षक जामकर यांनी सदरील गोवंशाचे पंचनामे करून वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविले आहेत यामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यावेळी सदर संबंधित वनरक्षकाने सांगितले की सध्या तप्त उन्हामुळे जनावर ही मानवस्तीकडे आणि गावाकडे धाव करत आहे तेव्हा नागरिकांनी शेतात जाताना किंवा जंगल भागातून दुचाकीवरून प्रवास करीत असताना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
